S M L

धक्कादायक : सांगलीत दगडाने ठेचून गुंडाची हत्या

सांगली मध्ये एका गुंडाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेने सांगलीत खळबळ उडालीय.

Updated On: Aug 22, 2018 11:21 AM IST

धक्कादायक : सांगलीत दगडाने ठेचून गुंडाची हत्या

सांगली,ता.22 ऑगस्ट : सांगली मध्ये एका गुंडाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. धारधार शस्त्र व डोक्यात दगड घालून गणेश माळगे याची निर्घृण हत्या केली आहे. हनुमान नगर येथे ही घटना घडली असून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या माळगे याचा खून पूर्ववैमनस्यातुन झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. माळगे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी स्वरूपाची आहे, त्याच्यावर विविध प्रकारचे चार गुन्हे दाखल आहेत. माळगे हा त्याचे दोन सहकारी ओंकार पाटील आणि प्रथमेश कदम यांच्यासह त्याच्या दुकाकीवरून हनुमान नगरमध्ये गेला होता. तो हनुमान नगरमधील तिसर्‍या गल्लीत आल्यावर संशयित धनंजय गवळी, सचिन गवळी आणि त्याच्या साथीदारांनी त्याच्या दुचाकीची चावी काढून घेवून त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आपली गेम होणार हे लक्षात आल्यावर गणेश जीवाच्या आकांताने पळत सुटला. हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग सुरू केला.

गणेशची दुचाकी ज्या ठिकाणी उभी होती. त्यापासून साधारणपणे १०० फुटांवर त्याला हल्लेखोरांनी गाठले. त्याच्यावर धारदार शस्त्राने तब्बल १० वार केले तो खाली पडल्यावर त्याच्या डोक्यात भलामोठा दगड घातला. घटनास्थळी रक्ताचे थारोळे साचले होते. गणेशची गेम केल्यानंतर सर्व हल्लेखोरांनी तेथून पळ काढला.

गणेशचा मृतदेह शासकीय रुग्णालयामध्ये आणल्यानंतर रुग्णालयाच्या परिसरात तरुणांची मोठी गर्दी झाली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. या प्रकरणी धनंजय गवळी याच्यासह सात हल्लेखोरांनी हा खून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्प़न्न झाले आहे. माजी नगरसेवक राजू गवळी याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

VIDEO : भर पावसात खासगी बस जळून खाक !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 22, 2018 11:21 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close