क्षणात संपलं 7 जन्माचं नातं, घरगुती वादानंतर पत्नीवर झाडल्या गोळ्या आणि...

घरगुती वादातून पतीनं पत्नीवर गोळ्या झाडून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरातील सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 12, 2018 01:56 PM IST

क्षणात संपलं 7 जन्माचं नातं, घरगुती वादानंतर पत्नीवर झाडल्या गोळ्या आणि...

नागपूर, 12 सप्टेंबर : घरगुती वादातून पतीनं पत्नीवर गोळ्या झाडून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरातील सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. रविंद्र नागपुरे या एका प्लायवूड व्यापाऱ्याने आपल्या पत्नीवर गोळ्या झाडून तिची हत्या केली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सगळ्यात धक्कादायक म्हणजे पत्नीला गोळ्या घातल्यानंतर त्याने स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना घडताच कुटुंबियांनी आणि स्थानिकांनी त्यांच्याकडे धाव घेतली आणि दोघांनाही गंभीर अवस्थेत जवळच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

रवी नागपुरे आणि मीना नागपुरे असं या दाम्पत्याचं नाव आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली. पण आज उपचारादरम्यान, मीना आणि रवी दोघांचाही मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, या संदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर आरोपीजवळ गावठी रिव्हाॅल्वर आलं कुठून याचा सध्या पोलीस शोध घेताहेत. पण या धक्कादायक प्रकारामुळे नागपुरे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. तर संपूर्ण परिसरातून यावर हळहळ व्यक्त होत आहे.

 

VIDEO : बाप्पासाठी उकडीचे मोदक करा ५ सोप्या स्टेप्समध्ये

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 12, 2018 01:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close