संशयावरून पत्नीचा खून करून ओंजळीने प्यायला रक्त, पतीला मरेपर्यंत जन्मठेप

संशयावरून पत्नीचा खून करून ओंजळीने प्यायला रक्त, पतीला मरेपर्यंत जन्मठेप

संशयावरून पत्नीच्या डोक्यात घातला वरवंटा, करवतीने कापलं आणि नंतर ओंजळीने तिचं रक्त प्यायला.

  • Share this:

नितीन बनसोडे, प्रतिनिधी

लातूर, 31 ऑक्टोबर : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून करून ओंजळीने रक्त पिण्याचे अघोरी कृत्य करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. २०१५ साली लातुरात घडलेल्या निर्घृण आणि अघोरी खून प्रकरणात न्यायालयाने महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निकाल दिला आहे.

लातूर शहरातल्या इंदिरानगर भागात २०१५ साली घडलेली अत्यंत धक्कादायक आणि अघोरी घटना समोर आली होती. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पहाटेच्या वेळी पतीनं पत्नीच्या डोक्यात वरवंटा घातला. त्यानंतर या राक्षसाने तिला करवतीने कापलं आणि त्यानंतर त्याने जे केलं त्यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही.

VIDEO: नगरसेविकेचा स्टंट, आंदोलनासाठी चढली थेट दिव्याच्या खांबावर

त्यानंतर त्याने चक्क तिचं रक्त आपल्या शरीराला लावून ओंजळीने रक्त पिण्याचा अघोरी प्रकार आरोपी संजय गायकवाड यानं केला होता. हे वाचनाता देखील तुमच्या अंगावर काटे येतील पण इतरा गंभीर प्रकार लातूरमध्ये घडला होता.

या घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेला होता. यातील मयत सागरबाई गायकवाड यांच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार लातूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात हे प्रकरण सुरू होतं.

या प्रकरणातील साक्षीदाराच्या साक्षीवरून जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. जोशी यांनी या प्रकरणी ऐतिहासिक निर्णय देत आरोपी पती संजय गायकवाडला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पण कोर्टाच्या या सुनावणीनंतरही हा धक्कादायक प्रकार इंदिरा नगरकर अजूनही विसरू शकलेले नाहीत. त्यामुळे अशा अघोरी प्रथा थांबवणं महत्त्वाचं आहे.

नक्षली हल्ला- पत्रकारासमोर उभा ठाकलेला मृत्यू, आईसाठी रेकॉर्ड केला भावुक VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 31, 2018 04:40 PM IST

ताज्या बातम्या