धक्कादायक! विटांनी ठेचून पत्नीची हत्या, 4 महिन्यांची चिमुकली रात्रभर आईच्या मृतदेहाशेजारी

धक्कादायक! विटांनी ठेचून पत्नीची हत्या, 4 महिन्यांची चिमुकली रात्रभर आईच्या मृतदेहाशेजारी

केवळ तीनशे रुपयांच्या हिशेबावरून पतीनं दारूच्या नशेत पत्नीची विटांनी ठेचून निर्घृण हत्या केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे.

  • Share this:

बीड, 1 ऑगस्ट : केवळ तीनशे रुपयांच्या हिशेबावरून पतीनं दारूच्या नशेत पत्नीची विटांनी ठेचून निर्घृण हत्या केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. संतापजनक बाब म्हणजे या नराधमानं आपल्या चार वर्षांच्या चिमुकलीसमोरच तिच्या आईचा जीव घेतला. अंगावर शहारे आणणारी ही घटना बीडमधील अंबेजोगाई तालुक्यातील सातेफळ शिवारातील आहे. दीपाली अशोक नरसिंगे असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे.

नेमकं काय घडलं ?

तीनशे रुपयांच्या हिशेबावरून या दाम्पत्यामध्ये जोरदार भांडण झालं. दोघांमधील हा वाद इतका विकोपाला गेला की पतीनं पत्नीचा विटांनी ठेचून खून केला.  हृदय पिळवटून टाकणारी बाब म्हणजे आईच्या मृतदेहाशेजारी तिची चार महिन्यांची मुलगी रात्रभर होती. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अशोक नरसिंगे (वय 27 वर्ष) याला अटक केली आहे.

(वाचा : या Instagram सेलेब्रिटीची झाली खळबळजनक हत्या; सूटकेसमध्ये मिळाला मृतदेह)

300 रुपयांच्या हिशेबाचा वाद

2018 साली अशोक आणि दीपालीचा विवाह झाला होता. सातेफळ विट भट्टीवर अशोक आणि दीपाली मजुरीचं काम करत होते. या दोघांमध्ये मंगळवारी (30 जुलै) रात्री 300 रुपयांच्या हिशेबावरून टोकाचा वाद झाला. यावेळी दारूच्या नशेत असलेल्या अशोकनं रागाच्या भरात अशोक गुलाब नरसिंगे याने पाच महिन्यांच्या चिमुरड्या लेकीसमोरच पत्नी दिपालीला विटांनी ठेचून मारले.

(वाचा : मधुचंद्रासाठी नवविवाहिता आली मुंबईत.. प्रियकराच्या मदतीने चिरला पतीचा गळा)

दारूच्या व्यसनामुळे संसार उद्ध्वस्त

अशोक नरसिंगेला दारूचे व्यसन होतं. त्यामुळे सातत्यानं नवरा-बायकोत वाद व्हायचे. आठवडी बाजारानिमित्त अशोक अंबाजोगाई शहरात आला होता. बाजार केल्यानंतर घराकडे जात असताना अशोक दारू प्यायला. दारूच्या नशेत असलेला अशोक जेव्हा विट भट्टीवर आला. तेव्हा त्याच्यात आणि दीपालीमध्ये जोरदार भांडण झालं. याचदरम्यान अशोकनं दीपालीच्या डोक्यावर विटांचा मारा केला. या मारहाणीत दीपालीचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक बाब उघडकीस आल्यानंतर स्थानिकांनी तातडीनं याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पळण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला बेड्या घातल्या.

(वाचा : धक्कादायक!वाढदिवशीच मृत्यूचं गिफ्ट,मुंबईत मित्रांनीच केली मित्राची निर्घृण हत्या)

दहशतवादी हल्ल्यांपेक्षा रस्ते अपघातात जास्त मृत्यू, सकाळच्या टॉप 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2019 11:55 AM IST

ताज्या बातम्या