तुला शेवटचं भेटायचंय...; हळदीपूर्वी एक्स बॉयफ्रेंडनं घेतला 'ती'चा जीव

तुला शेवटचं भेटायचंय...; हळदीपूर्वी एक्स बॉयफ्रेंडनं घेतला 'ती'चा जीव

crime news : घरातून लाडक्या मुलीची सासरी पाठवणी करण्याऐवजी अंत्ययात्रा काढण्याचं मोठं दुःख कोल्हापुरातील एका कुटुंबीयांवर कोसळलं आहे.

  • Share this:

संदीप राजगोळकर

कोल्हापूर, 1ऑगस्ट : घरातून लाडक्या मुलीची सासरी पाठवणी करण्याऐवजी अंत्ययात्रा काढण्याचं मोठं दुःख कोल्हापुरातील एका कुटुंबीयांवर कोसळलं आहे. एक्स बॉयफ्रेंडनं लग्नाच्या तीन दिवसांपूर्वी एका तरुणीवर लोखंडी रॉडनं हल्ला करून तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. अमृता कुंभार असं हत्या करण्यात आलेल्या तरुणीचं नाव आहे. या प्रकरणी योगेश चौगुलेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बेळगाव जिल्ह्यातील निपाणी तालुक्यातील कसनाळ गावातील संतापजनक घटना आहे. अमृताचा येत्या 3 ऑगस्ट रोजी विवाह होणार होता. कुटुंबीयांनी इस्लामपूरमधल्या एका युवकाशी तिचं लग्न ठरवलं होतं.

शेवटचं भेटायचं सांगून केला घात

या दोन दिवसांत अमृताच्या अंगाला हळद लागणार होती. तिच्या नवीन आयुष्याला सुरुवात होणार होती. पण तिचं हे सुख एक्स बॉयफ्रेंड योगेश पाहावलं नाही. सूड भावनेनं पेटलेल्या योगशेला अमृतावर राग काढायचा होता. यासाठी त्यानं रक्तपाताचा कट रचला. तुला शेवटचं भेटायचं, असं सांगत योगेशनं लग्नाच्या तीन दिवसांपूर्वी अमृताला एका ठिकाणी बोलावून घेतलं. यानंतर बाइकवरून मानकापूर मार्गे जवळच्या शेतात नेलं. तिथे या दोघांमध्ये प्रचंड बाचाबाची झाली. यादरम्यान, योगेशनं तिच्या डोक्यात लोखंडी रॉडनं जबर मारहाण केली आणि तो फरार झाला.

(वाचा : धक्कादायक! विटांनी ठेचून पत्नीची हत्या, 4 महिन्यांची चिमुकली रात्रभर आईच्या मृतदेहाशेजारी)

...आणि सापडला अमृताचा मृतदेह

घराबाहेर जाऊन अमृताला बराच वेळ उलटून गेला होता. त्यामुळे कुटुंबीयांनी तिची शोधाशोध करण्यास सुरुवात केली. यादरम्यान, कुटुंबीयांनी जे काही आढळून आलं ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. लाडक्या लेकीचा रक्तानं माखलेला मृतदेह त्यांना कसनाळच्या शेतात आढळून आला.

(वाचा : सावधान! ऑनलाइन मैत्री करताय या 7 गोष्टींकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका)

अमृता आणि योगेशचे सहा वर्षांचे होते प्रेमसंबंध

कोल्हापूर जिल्ह्यातील जांभळी गावची अमृता कुंभार आणि सीमाभागातल्या बारवाड गावातील योगेश चौगुले या दोघांचं गेल्या सहा वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होतं. जांभळी गावात शिक्षण घेत असताना दोघांचंही प्रेम जुळले. पण यादरम्यान घरातल्यांनी अमृताचा विवाह इस्लामपूरमधल्या एका युवकाशी ठरवला. ही गोष्ट योगेशला सहन झाली नाही. यामुळे रागाच्या भरात त्यानं आपल्या प्रेयसीची हत्या केली. दरम्यान, कर्नाटकमधल्या सदलगा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. योगेश चौगुलेला अटकदेखील केली आहे.  पण घटनेमुळे अख्खं कोल्हापूर हादरलं आहे.

(वाचा : मीना कुमारी यांना खरंच तिहेरी तलाक देण्यात आला होता का?)

मुंबई लोकलमध्ये 'पोलडान्स' करत तरुणाची स्टंटबाजी, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2019 12:54 PM IST

ताज्या बातम्या