S M L

धक्कादायक! एकाच झाडाला प्रेमी युगुलाने घेतला गळफास, 3-4 दिवसांनी सापडला मृतदेह

औंढा नागनाथ येथील गोकर्ण माळात प्रेमी युगुलाने एकाच झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे.

Updated On: Dec 7, 2018 02:05 PM IST

धक्कादायक! एकाच झाडाला प्रेमी युगुलाने घेतला गळफास, 3-4 दिवसांनी सापडला मृतदेह

कन्हैय्या खंडेलवाल, प्रतिनिधी

हिगोली, 07 डिसेंबर : हिंगोलीमध्ये प्रेमी युगुलाचा आत्महत्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. औंढा नागनाथ येथील गोकर्ण माळात प्रेमी युगुलाने एकाच झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे. हा खळबळजनक प्रकारामुळे संपूर्ण हिंगोली हादरून गेलं आहे.

सगळ्यात गंभीर म्हणजे गेल्या 3-4 दिवसांआधीच या दोघांनी आत्महत्या केली आहे. पण याबद्दल कोणालाच माहिती नव्हतं. शुक्रवारी संपूर्ण प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात आला आणि त्यानंतर याबद्दल पोलिसांना माहिती देण्यात आली.


घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पण आत्महत्येस खूप दिवस झाले असल्याकारणामुळे त्यांची ओळख पटवण्यास पोलिसांना अडचणी आल्या. अखेर चौकशीनंतर आणि पुरव्याअंतर्गत या दोघांची ओळख पटवण्यात आली.

पोलिसांनी या दोघांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पण एवढ्या टोकाला जात या दोघांनी आत्महत्येचा निर्णय का घेतला याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पण या संपूर्ण घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पाहायला मिळतं.

या खळबळजनक प्रकाराअंतर्गत हाट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आता या संपूर्ण प्रकाराचा कसून तपास करत आहेत.

Loading...


VIDEO: देवाची पूजा करते म्हणून वृद्ध महिलेला चौघांनी बेदम मारलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 7, 2018 12:36 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close