S M L

पेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या ?

Updated On: Aug 19, 2018 06:55 PM IST

पेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या ?

 बुलडाणा, 19 आॅगस्ट :  जिल्ह्यातील चिखली तालुक्यात एका पेरूच्या झाडाला लटकून प्रेमी युगुलांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे अगदी जमिनीला पाय टेकतील अशा झाडाला गळफास लावून आत्महत्या केलीये. त्यामुळे ही आत्महत्या आहे की हत्या याचा संशय बळावलाय.

बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात हातनी आणि मालगनी गावादरम्यान एका पेरूच्या शेतात प्रेमी युगुलाचे जोडपे पेरूच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. या प्रेमी युगलाचे पाय सहज जमिनीला टेकले आहे.

जोडप्याधील मृतक तरूण हा खुपगाव चा ज्ञानेश्वर डुकरे आहे.  तर तरुणी ही सविता ढाकणे असल्याचं स्पष्ट झालं आहे.

ज्ञानेश्वर हा काळूबा पाटील यांच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून कामाला होता तर मालकाच्या मुलीसोबत त्याचे सूत जुळले होते. काही दिवस अगोदर हे दोघे सुरत येथे पळून गेले होते तर नागपंचमीच्या दिवशी ते गावी परतले होते. या दोघांनी आत्महत्या केली का केली याचा तपास पोलीस करत आहेत.

VIDEO : गुजरातमध्ये महाराष्ट्रीयन दोन महिलांची तुफान मारामारी

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 19, 2018 06:55 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close