आता बोला !, सन्मानिय नगरसेवकच करतोय हायवे लगत कारमधून दारूविक्री

आता बोला !, सन्मानिय नगरसेवकच करतोय हायवे लगत कारमधून दारूविक्री

प्रशांत पुसाळकर हे आपल्या परमिट रूमपासून थोडया अंतरावर आपली गाडी उभी ठेवून, त्या मध्ये भरलेल्या मद्याच्या बॉक्सची विक्री

  • Share this:

01 एप्रिल : देशभरातील हायवे लगतच्या बार आणि दारूच्या दुकानांवर कारवाई करायला सुरूवात झालीय. पण दापोलीतला एक परमिट रूम चालक चक्क एक विद्यमान नगरसेवक प्रशांत पुसाळकर आहे. विशेष म्हणजे सन्मानिय नगरसेवक महोदय आपल्या गाडी दारू विकत असल्याचं उघड झालंय.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 500 मीटर च्या आतील परमिट रूम,बिअर बार आणि वाईन्स शाॅपीवर विक्रीस बंदी आणल्याने राज्यभरात हायवेलगतच्या बार आणि वाईन शॉपवर कारवाई सुरू झालीय. मुंबई, पुणे, नाशिक, कोकण, मराठवाडा, नागपूरसह सगळीकडेच हायवेलगतचे बार सील होत आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई सुरू केलीय.

मात्र, दापोलीत वेगळंच चित्र पाहण्यास मिळालं. काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक प्रशांत पुसाळकर यांच्या मालकीचा एक परमिट रूम आणि बार आहे. बरं हे इथंच थांबलं नाही. तर स्वत:  प्रशांत पुसाळकर हे आपल्या परमिट रूमपासून थोडया अंतरावर आपली गाडी उभी ठेवून, त्या मध्ये भरलेल्या मद्याच्या बॉक्सची विक्री करतायत.

मात्र, याकडे प्रशासनाने सोयिस्कररित्या दुर्लक्ष केलंय. विशेष म्हणजे दिवसभरात एक्साईजचे अधिकारी बार सील करायला फिरकले सुद्धा नाहीत. त्यामुळेच अधिकाऱ्यांना हाताशी धरून दारूविक्री करत असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. मात्र, राजकीय पक्षाच्या पुढाऱ्याचं पोलिसांशी साटंलोटं असेल तर मद्यविक्रीवर बंदी आणल्याचे दावे कसे फोल ठरतात त्याचंच हे जिवंत उदाहरण आज या निमित्ताने उजेडात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2017 10:11 PM IST

ताज्या बातम्या