Elec-widget

काँग्रेसचं पराभवाचं सत्र थांबलं, ‘या’ नगरपरिषदेवर रोवला झेंडा

काँग्रेसचं पराभवाचं सत्र थांबलं, ‘या’ नगरपरिषदेवर रोवला झेंडा

चंद्रपुरातील ब्रम्हपुरी नगरपरिषद जिंकण्यास काँग्रेसला यश आलं आहे. या नगरपरिषदेतील 20 पैकी 12 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली आहे.

  • Share this:

चंद्रपूर, 10 डिसेंबर : धुळे आणि नगरमध्ये काँग्रेसला धक्का बसलेला असतानाच आता चंद्रपुरातील ब्रम्हपुरी नगरपरिषद जिंकण्यास काँग्रेसला यश आलं आहे. या नगरपरिषदेतील 20 पैकी 12 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली आहे.

ब्रम्हपुरी नगरपरिषद निवडणुकीची वैशिष्ट्ये:

-नगराध्यपदाच्या निवडणुकीत कांग्रेसच्या रीता उराडे 1600 मतांनी विजयी

-20 पैकी 12 जागांवर काँग्रेसचा विजय

-भाजपकडे 3 जागा

Loading...

-अपक्षांना 5 जागांवर यश

-विधानसभेतले काँग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार यांना नगरपरिषदेवर वर्चस्व मिळवण्यात यश

नांदेडमध्ये भाजपचा विजय

नांदेडची लोहा नगर परिषद भाजपच्या खात्यात आली आहे. आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी ही जागा जिंकली आहे. तर यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हानांना मोठा धक्का बसला असं म्हणायला हरकत नाही.

-लोहा नगर परिषदेच्या 17 जागांपैकी 13 जागांवर भाजपने सत्ता स्थापन केली आहे तर फक्त 4 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे. नगरपरिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे गजानन सूर्यवंशी विजयी झाले आहेत तर काँग्रेसचे सोनू संगेवार हे पराभूत झाले आहेत. एकूणच नांदेडमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. तर तिकडे धुळे आणि अहमदनगरमध्ये महापालिकांचे निकाल आता अंतिम टप्प्यात आले आहेत.


पुण्याचा नाद खुळा! आता गाणाऱ्या गाढवाचा VIDEO व्हायरल


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 10, 2018 12:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...