नांदेडमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांसमोरच पुरवली कॉपीबहाद्दरांनी कॉपी

नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातल्या चिखली गावात ही घटना घडली आहे. तिथल्या गोविंदराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात मुलं खिडकीतून सर्रास कॉपी पुरवत असल्याची गोष्ट समोर आली आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Feb 26, 2018 06:52 PM IST

नांदेडमध्ये  पोलीस कर्मचाऱ्यांसमोरच पुरवली कॉपीबहाद्दरांनी कॉपी

26  फेब्रुवारी:  उस्मानाबादमध्ये सर्रास कॉपी पुरवण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता नांदेडमधले कॉपीबहाद्दर मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. नांदेडमध्ये तर चक्क पोलिसांच्या समोरच कॉप्या पुरवल्याची घटना पुढे  आली आहे.

नांदेड जिल्ह्यातल्या  लोहा तालुक्यातल्या चिखली गावात ही घटना घडली आहे.  तिथल्या गोविंदराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात मुलं खिडकीतून सर्रास कॉपी पुरवत असल्याची गोष्ट समोर  आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे चक्क पोलीस कर्मचाऱ्यांसमोर हा प्रकार सुरू  आहे. यामुळे कॉपीबहाद्दरांना आता कुणाचाच धाक नसल्याचं उघड झालंय. पोलीस त्यांना दुर सारत असतानाही ते दुर जात नसल्याची  बाब समोर आली आहे.  काही दिवसांपूर्वी  इंग्रजीचा पेपर व्हाट्सअॅपवर व्हायरल झाला  होता. तर उस्मानाबादमध्येही कॉपीचं प्रकरण पुढे आलंं होतं. आता गेल्या  आठवड्याभरातील ही तिसरी घटना आहे. त्यामुळे आता  या साऱ्या प्रकाराला चाप बसतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

वाढत्या कॉपी प्रकरणी शिक्षण खातं आता काय पाऊलं उचलणं हे महत्त्वाचं ठरणार आङे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 26, 2018 06:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close