S M L

बाभडबारी घाटात कंटेनरची एसटीला धडक, 6 प्रवासी जागीच ठार

नंदूरबार-नाशिक एसटीचा देवळा-चांदवड मार्गावरील बाभडबारी घाटात मोठा अपघात झाला आहे.

Updated On: Sep 4, 2018 02:16 PM IST

बाभडबारी घाटात कंटेनरची एसटीला धडक, 6 प्रवासी जागीच ठार

मनमाड, 04 सप्टेंबर : नंदूरबार-नाशिक एसटीचा देवळा-चांदवड मार्गावरील बाभडबारी घाटात मोठा अपघात झाला आहे. एसटी बस आणि कंटेनरची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात 6 प्रवासी जागीच ठार झाले आहेत तर 12 ते 15 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

प्रवाशांनी भरलेली नंदूरबार-नाशिक एसटीही देवळा-चांदवड मार्गावरून येत होती. यावेळी समोरून येणाऱ्या कंटेवरची बसला जोरात धडक बसली. यात दोन्हीही गाड्यांचा चुरा झाला आहे. तर बसमधील 6 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, घटना घडताच स्थानिकांनी आणि इतर प्रवाशांनी जखमींना तात्काळ चांदवड-देवळा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. तर घटनेची माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळावरून 6 मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

पोलीस सध्या मृतांची आणि जखमी प्रवाशांची ओळख पटवण्याच काम करत आहेत. या अपघातामुळे मोठी जीवित हानी झाली असं म्हणायला हरकत नाही. दरम्यान, या बसमध्ये किती प्रवासी होते याचाही तपास आता पोलीस करत आहेत.

या क्रिकेटरने सानिया मिर्झाची काढली छेड, होऊ शकते आजीवन बंदी

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 4, 2018 02:14 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close