S M L

वीज बील भरलं नाही तर शेतकऱ्यांचं कनेक्शन कट करण्याचा सरकारचा फतवा

गेल्या तीन वर्षांत सरकारनं शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज कापली नाही. पण आता महावितरणला थकबाकी झेपत नाही. येत्या सात दिवसांत किमान चालू बिल भरा नाहीतर वीज कापण्याचा इशारा देण्यात आलाय

Chittatosh Khandekar | Updated On: Oct 31, 2017 10:07 AM IST

वीज बील भरलं नाही तर शेतकऱ्यांचं कनेक्शन कट करण्याचा सरकारचा फतवा

31 ऑक्टोबर: सात दिवसात चालू वीज बिल भरा नाहीतर वीज कनेक्शन तोडण्यात येईल असा फतवा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढलाय. राज्यातल्या 41 लाख शेतकऱ्यांकडे 19 हजार कोटी रुपयांची वीज बिल थकबाकी आहे.

गेल्या तीन वर्षांत सरकारनं शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज कापली नाही. पण आता महावितरणला थकबाकी झेपत नाही. येत्या सात दिवसांत किमान चालू बिल भरा नाहीतर वीज कापण्याचा इशारा देण्यात आलाय. ज्यांचं जास्त वीज बिल थकीत आहे, त्यांनी मुख्यमंत्री कृषीसंजीवनी योजनेत सहभागी व्हावं आणि हप्त्याहप्त्यात वीज बिल भरावं असं आवाहनही त्यांनी केलंय. बावनकुळे काहीही सांगत असले तरी राज्यातल्या शेतकऱ्याची सात दिवसांत चालू वीज बिल भरण्याची क्षमता आहे का असा सवाल विचारण्यात येतोय.

त्यामुळे आता सरकार  कारवाई करत का आणि त्याचे काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 31, 2017 10:07 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close