Elec-widget

स्वयंसेवक लढण्यासाठी तयार, या मोहन भागवतांच्या वक्तव्यावर टीकेची झोड

स्वयंसेवक लढण्यासाठी तयार, या मोहन भागवतांच्या वक्तव्यावर टीकेची झोड

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण झाला आहे.

  • Share this:

12 फेब्रुवारी : सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण झाला आहे. 'लष्कराला तयारीसाठी पाच सहा महिन्यांचा वेळ लागू शकतो. मात्र संघाचे स्वयंसेवक तीन दिवसांमध्ये लढण्यासाठी तयार होतील' असं भागवत यांनी उत्तरप्रदेशातल्या मुजफ्फरपूर इथं एका कार्यक्रमात म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस आणि इतर पक्षांनी भागवतांवर टीकेची झोड उठवली आहे. हा लष्कराचा अवमान असल्याचा आरोप काँगेसनं केला आहे.

संघ ही लष्करी संघटना नाही मात्र आमची शिस्त लष्करासारखी आहे. संघ स्वयंसेवक मातृभूमीच्या रक्षणासाठी बलिदानास तयार आहेत. देशातील आपत्तीच्यावेळी संघ स्वयंसेवक नेहमीच तत्पर असतात, असं सांगतानाच 'भारत-चीन युद्धाच्यावेळी स्वयंसेवक सीमेवर पाय रोवून उभे राहिले. स्वंयसेवकांनी चीनच्या सैनिकांचा मुकाबला केला. स्वयंसेवकांनी जर मनात आणलं तर आताही चीनच्या सैनिकांना भारतात घुसखोरी करणं कठीण होईल,' असेही यावेळी भागवत यांनी सांगितले. भागवतांच्या या वक्तव्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहे.

दरम्यान, मोहन भागवत यांच्या या वक्तव्यावर केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने जोरदार टीका केली आहे. आपचे राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांनी ट्विटरवरुन या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. त्या ट्विटमध्ये त्यांनी लिहलं की, 'जर हे वक्तव्य दुसऱ्या कोणत्या पक्षाच्या नेत्याने दिलं असतं तर भाजपच्या लोकांनी त्याला आतापर्यंत पाकिस्तानात धाडलं असतं. मीडियाने तर फाशीच्या शिक्षेची मागणी केली असती. पण आता गोष्ट भागवतांची आहे.'

भागवत यांचं हे वक्तव्य लष्कराचे खच्चीकरण करणारे असून हा लष्कराचा अपमान आहे. त्याबद्दल भागवत यांनी माफी मागायला हवी, अशी मागणी राष्ट्रीय जनता दलाचे राज्य प्रवक्ते मृत्युंजय तिवारी यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 12, 2018 10:01 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...