प्रकाश आंबेडकरांना शह देण्यासाठी काँग्रेसचा प्लॅन तयार, हालचाली सुरू

राज्यात वंचित बहुजन आघाडीद्वारे प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी यांच्या एकत्रित सभा होत आहेत. त्यांच्या सभांना होणारी गर्दी काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 9, 2019 10:06 AM IST

प्रकाश आंबेडकरांना शह देण्यासाठी काँग्रेसचा प्लॅन तयार, हालचाली सुरू

सागर कुलकर्णी, मुंबई, 9 मार्च : लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन विकास आघाडी स्वतंत्रपणे लढेल, असं सध्याचं चित्र आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रकाश आंबेडकर यांना शह देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

आघाडीने आता समाजवादी पक्ष आणि बसपा यांच्यासोबत जुळवून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची माहिती आहे. मुस्लिम आणि दलित मतांचे विभाजन होऊ नये, यासाठी आघाडीच्या वतीने प्रयत्न केले जात आहे. राज्यात वंचित बहुजन आघाडीद्वारे प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी यांच्या एकत्रित सभा होत आहेत. त्यांच्या सभांना होणारी गर्दी काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या सभेत दलित-मुस्लिम समाजाची संख्या जास्त आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला जात होता.

पण प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेच्या 22 जागा मागितल्याने ही महाआघाडी होण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. अशातच 'न्यूज 18 लोकमत'च्या 'न्यूज रूम चर्चा' या कार्यक्रमात आंबेडकर यांनी पुढील काळात राज्यात सर्व जागेंवर उमेदवार जाहीर करण्याचे संकेत दिले, आहेत.

यामुळे दलित-मुस्लिम मतदानाचा फटका किमान विदर्भ आणि मुंबईत बसू नये, यासाठी काँग्रेस नेत्यांनी दिल्लीतून हालचाली सुरू केल्याचं म्हटलं जातं. राज्यात सपाला लोकसभा जागा देण्याऐवजी विधानसभा जागा जास्त देण्याचे आश्वासन दिले जाऊ शकते. तर विदर्भात बसपाचीही ताकद काही भागात चांगली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाला याठिकाणी फायदा होईल असा अंदाज आहे. त्यामुळेच काँग्रेसकडून त्यांना सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Loading...


VIDEO : राष्ट्रवादीचं तिकीट आणि भाजपमध्ये जाण्याची चर्चा, काय म्हणाले उदयनराजे?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 9, 2019 09:59 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...