मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी आमच्या सरकारने काही केलचं नाही का? - सोनिया गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेपुढे असे चित्र निर्माण केले की २०१४ पूर्वी आपला देश म्हणजे जणू काही एक कृष्णविवर होते. मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी काही घडलेच नाही का?

Renuka Dhaybar | Updated On: Mar 10, 2018 01:22 PM IST

मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी आमच्या सरकारने काही केलचं नाही का? - सोनिया गांधी

10 मार्च : मुंबईच्या दौऱ्यावर असलेल्या काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेपुढे असे चित्र निर्माण केले की २०१४ पूर्वी आपला देश म्हणजे जणू काही एक कृष्णविवर होते. मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी काही घडलेच नाही का? असा परखड सवाल विचारत सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र डागलंय.

एका खासगी कार्यक्रमात घेण्यात आलेल्या मुलाखतीदरम्यान सोनिया गांधी बोलत होत्या. देशात सध्याच्या घडीला धार्मिक तेढ वाढीला लागली आहे. दलितांवर आणि महिलांवर जाणीवपूर्वक हल्ले केले जात आहेत. आपल्या देशाला विकासाची गरज आहे मात्र अशा घटनांमुळे देश कुठे चालला आहे हे आपण पाहतोच आहोत. असंही सोनिया गांधी म्हणाल्या आहेत.

२६ मे २०१४च्या आधी देशाची प्रगती झालीच नाही का? २०१४च्या आधी देशात विकास झालाच नाही का? यूपीए सरकारने देशासाठी काहीही केले नाही का? हे आणि असे अनेक प्रश्न विचारत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला धारेवर धरले.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी भाजपा आणि नरेंद्र मोदींच्या मार्केटिंगपुढे आम्ही कमी पडलो. भ्रष्टाचाराचा मुद्दा आकडे फुगवून सांगितला गेला असेही सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान त्या बोलत होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 10, 2018 01:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close