News18 Lokmat

कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या शोभा बोंद्रे यांची निवड

कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या शोभा बोंद्रे यांची तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीच्या महेश सावंत यांची निवड झाली आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: May 25, 2018 01:21 PM IST

कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या शोभा बोंद्रे यांची निवड

कोल्हापूर, ता. 25 मे : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या शोभा बोंद्रे यांची तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीच्या महेश सावंत यांची निवड झाली आहे. दरम्यान या निवडणुकीत शिवसेना तटस्थ राहिली त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक आज सभागृहामध्ये गैरहजर होते.

काँग्रेसच्या शोभा बोंद्रे यांच्या विरोधात ताराराणी आघाडीच्या रूपाराणी निकम यांनी अर्ज भरला होता पण 44 विरुद्ध 33 अशा मतांनी शोभा बोंद्रे या महापौर म्हणून निवडून आल्या आहेत. शोभा बोंद्रे या कोल्हापूर शहराच्या 46 व्या महापौर असतील.

दरम्यान शिवसेनेच्या प्रतिज्ञा निल्ले यांनी महापौर पदाच्या शर्यतीतून आपला अर्ज माघारी घेतला. दुसरीकडे महापौरपदी राष्ट्रवादीच्या महेश सावंत यांची निवड झाली आहे. त्यांच्याविरोधात ताराराणी आघाडीच्या कमलाकर भोपळे यांनी अर्ज दाखल केला होता पण ही निवडणुक देखील 44 विरुद्ध 33 अशीच झाली.

ही निवडणूक पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री हसन मुश्रीफ सतेज पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरली होती. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होत. पण अखेर काँग्रेस-राष्ट्रवादीचे महापौर आणि उपमहापौर महापालिकेत विराजमान झालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 25, 2018 01:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...