News18 Lokmat

'मुख्यमंत्र्यांना जुमलेबाजी अंगाशी आली', सचिन सावंत यांचं ट्विट

आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर होणाऱ्या महापूजेसाठी मी जाणार नाहीये, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

News18 Lokmat | Updated On: Jul 22, 2018 03:28 PM IST

'मुख्यमंत्र्यांना जुमलेबाजी अंगाशी आली', सचिन सावंत यांचं ट्विट

मुंंबई, 22 जुलै : आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर होणाऱ्या महापूजेसाठी मी जाणार नाहीये, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावर आता विरोधकांनी टीका करण्यास सुरूवात केली आहे. मुख्यमंत्र्यांना जुमलेबाजी अंगाशी आली अशा शब्दात ट्विट करत काँग्रेस प्रवक्ता सचिन सावंत यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

'सतत जनतेची फसवणूक केल्यामुळे मुख्यमंत्र्यांवर ही नामुष्की ओढवली आहे. जुमलेबाजी अंगाशी आली आहे. भाजपाच्या खोटारडेपणामुळे आषाढी एकादशीला पंढरपूरला विठूरायाच्या शासकीय महापूजेची वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा खंडित होत आहे याचं दुःख काँग्रेसला आहे'. अशा शब्दात त्यांनी ट्विट केलं आहे.

Loading...

मी उद्या महापूजेसाठी पंढरपूरला जाणार नाही - मुख्यमंत्री

दरम्यान, मुख्यमंत्र्यांना महापूजा करू देणार नाही, अशी भूमिका काहींनी घेतली, मी घरूनही पूजा करू शकतो, पण माझ्यासाठी 10 लाख वारकऱ्यांची सुरक्षा महत्वाची आहे, असं फडणवीस म्हणाले. या सगळ्यावर विरोधकांनी टीका केली आहे. तर काहींनी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णायाचं स्वागत केलं. जे वारकऱ्यांना वेठीस धरतात ते छत्रपतींचे मावळे असूच शकत नाही.. त्यामुळे वारकऱ्यांना विठ्ठलाचं दर्शन घेता यावं यासाठी मी पूजेला जाणार नसल्याचं त्यांनी म्हंटलंय.. मला दगड मारून आरक्षण मिळणार असेल तर मी त्यालाही तयार आहे, पण वास्तव हे आहे की आरक्षण केवळ आणि केवळ न्यायालयाकडूनच मिळू शकतं, असंही ते पुढे म्हणाले.

हेही वाचा...

मंगळवेढ्यात मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अडवला सुभाष देशमुखांचा ताफा

उद्याची आषाढी एकादशी सुरळीत पार पडण्यासाठी उदयनराजेंनी लिहलं पत्र

J&K : सुरक्षादलांनी कॉन्स्टेबल शहीद सलीम शहा यांच्या हत्येचा 'असा' घेतला बदला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 22, 2018 03:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...