News18 Lokmat

मनसेचा हिंसेच्या राजकारणावर विश्वास, महाआघाडीत त्यांना स्थान नाही - निरूपम

मनसेचा हिंसेच्या राजकारणावर विश्वास असल्याने त्यांना महाराष्ट्रात महाआघाडीत सामील करू घेतलं जाणार नाही असं मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी स्पष्ट केलंय.

News18 Lokmat | Updated On: Sep 30, 2018 05:24 PM IST

मनसेचा हिंसेच्या राजकारणावर विश्वास, महाआघाडीत त्यांना स्थान नाही - निरूपम

मुंबई,ता. 30 सप्टेंबर : मनसेचा हिंसेच्या राजकारणावर विश्वास असल्याने त्यांना महाराष्ट्रात महाआघाडीत सामील करू घेतलं जाणार नाही असं मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी स्पष्ट केलंय. मनसेचा कायद्यावर, घटनेवर विश्वास नाही. देशाच्या विविधतेवर त्यांचा विश्वास नाही त्यामुळं महाराष्ट्र निर्माण सेनेला महाआघाडीत घेण्याला आमचा सक्त विरोध असल्याचंही निरूपम यांनी सांगितलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं मनसेला सामील करून घेण्याचा प्रस्ताव मांडला होता. तर कुणाशी आघाडी करायची याचा निर्णय राज ठाकरे हेच घेतील असं मनसेचे सरचिटणीस संदिप देशपांडे यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांना वेळ असला तरी भाजप विरोधात विरोधी पक्षांची एकजूट सुरू झालीय. त्याचाच एक भाग म्हणून मनसेला महाघाडीत सामील करून घ्यावं असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसनं मांडला आहे. पण या प्रस्तावाला काँग्रेसनं जोरदार विरोध केलाय. स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावरचं नेतृत्वही मनसेशी आघाडी करण्याच्या विरोधात आहे असं संजय निरूपम म्हणाल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात येणाऱ्या उत्तर भारतीयांच्या लोढ्यांना विरोध हा मनसेचा मुख्य अजेंडा आहे. मनसेने स्टाईल आंदोलनाचा मुंबईतल्या उत्तर भारतीयांना चांगलाच प्रसाद मिळाला आहे. त्यामुळं त्याचा राग हा मनसेवर आहे. काँग्रेस हा देशव्यापी पक्ष असल्याने अशी आघाडी झाल्यास त्याचा काँग्रेसला उत्तरेतल्या राज्यांमध्ये जोरदार फटका बसू शकतो. त्यामुळं राष्ट्रवादीचा कितीही विचार असला तरी काँग्रेस मनसेशी आघाडी करण्याच्या विरोधात आहे. मनसेशी आघाडी केल्यास मराठी मतांमध्ये फुट पडेल असं राष्ट्रवादीला वाटतं.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर केला होता. त्याचाही राग काँग्रेसला आहे. भाजप आणि शिवसेनेचं पटत नसल्याने युतीची शक्यता ही अधांतरीच आहे. असं असताना महाराष्ट्रात महाआघाडी कशी होणार हा प्रश्नच आहे. शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी उघडपणे हातमिळवणी करणं अवघाड आहे. तर मनसे आणि शिवसेना एकत्र येणं हे अशक्य नसलं तरी तेवढच कठीण आहे.

VIDEO : पालिकेचं कामकाज पाहण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांसमोरच नगरसेवकांचा राडा

Loading...

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 30, 2018 05:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...