काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची अवस्था उंदरांसारखी-रावसाहेब दानवे

गावात कुणी पक्षात येत असेल तर त्याला बंधन घालू नका, सोडू नका, पक्षात घ्या असा आदेशच रावसाहेब दानवेंनी दिला.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 25, 2017 07:20 PM IST

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची अवस्था उंदरांसारखी-रावसाहेब दानवे

25 डिसेंबर : भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची जीभ पुन्हा घसरलीये. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची तुलना थेट उंदरांशी केलीये. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची अवस्था कोंडून ठेवलेल्या उंदरांसारखी झाली असून ते भाजपकडं येण्यासाठी धडपड करीत असल्याचं दानवेंनी म्हटलंय.

औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात रावसाहेब दानवे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. यांचा एक पाय बाहेर आणि एक पाय जेलमध्ये आहे. संध्याकाळ होईल आणि आपत्ती येईल याची भीती त्यांना वाटते म्हणून दबाव आणण्याचं काम हे करतात असा टोला दानवेंनी लगावला.

तसंच कोंडून ठेवलेले उंदीर दरवाजा उघडल्यावर जशी बाहेर पडतात तसे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधून लोक बाहेर पडले आहे. यातल बरेच जण भाजपाकडे येतात. त्यामुळे गावात कुणी पक्षात येत असेल तर त्याला बंधन घालू नका, सोडू नका, पक्षात घ्या असा आदेशच  रावसाहेब दानवेंनी दिला.

चुकीच्या माणसाला पैसे जाऊ नयेत म्हणून चेक  करून शेतकऱ्यांना पैसे दिले जातात. जे शेतकरी कर्जमाफीचा मधून बाजूला काढले असतील. त्यांच्यासाठी आम्ही एक समिती स्थापन केली आहे. ही समिती शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेईल जर काही जणांना चुकून वगळले असेल तर त्यांना पुन्हा एकदा यादीत घेऊन लाभ देणार अशी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली. तसंच ज्या शेतकऱ्यांचा फाॅर्म भरायचा राहिला असेल त्याला सुद्धा पुन्हा एकदा कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठी मुदत देणार असल्याचंही चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 25, 2017 07:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...