काँग्रेस-राष्ट्रवादीचे 'ते' 7 आमदार थेट मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार?

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संपर्कात असणारे सहा ते सात आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 6, 2019 10:30 AM IST

काँग्रेस-राष्ट्रवादीचे 'ते' 7 आमदार थेट मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार?

मुंबई, 6 जून : काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये नाराज असलेले आणि सध्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संपर्कात असणारे सहा ते सात आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. या आमदारांसोबत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रवेशाबाबत चर्चा करतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

आघाडीतील काही आमदार आमच्या पक्षात येतील, असा दावा भाजपकडून गेल्या काही दिवसांपासून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखेंच्या संपर्कात असलेले आमदार हे मुख्यमंत्र्यांना भेटण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर हे आमदार भाजपमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का असणार आहे.

दरम्यान, काँग्रेसचे नेते आणि विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे – पाटील यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यापूर्वी त्यांनी काँग्रेसच्या काही आमदारांसह खलबतं देखील केली. यावेळी भारत भालके, जयकुमार गोरे, अब्दुल सत्तार आणि माढाचे खासदार रणजित निंबाळकर देखील हजर होते. त्यामुळे काँग्रेसच्या काही आमदारांसह राधाकृष्ण विखे – पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार हे निश्चित झालं आहे. यामध्ये अब्दुल सत्तार यांच्या नावाचा देखील समावेश आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी नाराज असलेल्या राधाकृष्ण विखे – पाटील यांनी आघाडीचा प्रचार करणं देखील टाळलं होतं. त्यानंतर त्यांचा भाजप प्रवेश केव्हा होणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. पण, लवकरच राधाकृष्ण विखे – पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं आता निश्चित झालं आहे.


Loading...

VIDEO : 'तर बंड झाल्याशिवाय राहणार नाही', रायगडावर उदयनराजेंचा आक्रमक अवतार


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 6, 2019 10:30 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...