आघाडीच्या राजकारणात काँग्रेस-राष्ट्रवादी हे तर आता जुळे भाऊ – अजित पवार

राजकारणात सर्वच पत्ते उघड करायचे नसतात. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ असा सूचक इशारा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. आघाडीच्या राजकारणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे जुळे भाऊ असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

Ajay Kautikwar | News18 Lokmat | Updated On: Apr 3, 2018 06:41 PM IST

आघाडीच्या राजकारणात काँग्रेस-राष्ट्रवादी हे तर आता जुळे भाऊ – अजित पवार

मुंबई, 03 एप्रिल: राजकारणात सर्वच पत्ते उघड करायचे नसतात. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ असा सूचक इशारा राष्ट्रवादीच ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. न्यूज18 लोकमत्या बेधडक कार्यक्रमात बोलताना त्यांनी भाजपला हा इशारा दिला. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले राष्ट्रवादीचे नेते पुन्हा परत येणार का? या प्रश्नावर ते उत्तर देत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाचा चवथा टप्पा कालपासून सुरू झाला. त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी बेधडक प्रश्नांना आपल्या खास स्टाईलमध्ये तशीच बेधडक उत्तरं दिली.

सरकार विरोधातल्या असंतोषाचा फायदा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची ही हल्लाबोल यात्रा आहे. सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरलं असून जनतेत असोंष आहे. यासाठी भाजपप्रमाणेच शिवसेनाही जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.

अजित पवारांच्या मुलाखतीतले 10 महत्वाचे मुद्दे

राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे जुळे भाऊ, त्यामुळं मोठा कोण, छोटा कोण हा प्रश्नच नाही.

आघाडी करायची मानसिकता निर्माण झाली की चर्चेत अडचण येत नाही.

भाजपला जनाधार घटत चाललाय, राष्ट्रवादीचा जनाधार वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

दोनही पक्षांची बलस्थानं लक्षात घेऊन जागा वाटप होणं अपेक्षीत आहे.

मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असेल? हे ज्येष्ठ नेतेच ठरवतील.

राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांमध्ये मतभेद नाहीत. काही प्रश्न असतील तर शरद पवारांचा शब्द अंतिम.

आम्ही अंधश्रद्धा मानत नाही, कधी गंडेदोरे, अंगठ्या घातल्या नाहीत. मात्र आमची श्रध्दा आहे. 1967 पासून बारामतीत मारूतीला नारळ फोडूनच आमच्या प्रचाराची सुरवात होते.

राजकारणात खूप टक्के टोणपे खाल्ले, अनेक चूकांमधून शिकलो आणि स्वत:मध्ये बदल केला. सर्व मलाच कळते अशी माधी धारणा नाही.

हल्लाबोल यात्रेतल्या काही टप्प्यात धनंजय मुंडे किंवा इतर नेते सहभागी नाहीत याचा वेगळा अर्थ काढू नये. काही कामानिमित्त त्यांना दुसरीकडे जावं लागतं त्यामुळं त्यांना उपस्थित राहणं जमलं नाही.

भीमा-कोरेगावची घटना समाजाला कमीपणा आणणारी आहे. अशा घटना समाजात दुफळी निर्माण करतात. अशा घटनांमागचे मास्टरमाईंड शोधले पाहिजे.

 

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 3, 2018 06:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close