S M L

मराठा आरक्षणासाठी काँग्रेसचे आमदार सामूहिक राजीनाम्याच्या तयारीत !

Updated On: Jul 30, 2018 04:53 PM IST

मराठा आरक्षणासाठी काँग्रेसचे आमदार सामूहिक राजीनाम्याच्या तयारीत !

मुंबई, 30 जुलै : मराठा आरक्षणासाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतलीये. सर्व आमदारांनी सामूहिक राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. तसंच काँग्रेसचे आमदार राज्यपाल यांच्या भेट घेण्यासाठी गेले आहे. मराठा आरक्षणासाठी काँग्रेसचे आमदार विशेष अधिवेशनाची मागणी करणार आहे. याआधीही काँग्रेसचे आमदार पंढरपूर-मंगळवेढाचे काँग्रेसचे आमदार भारत तुकाराम भालके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलाय.

तळेगाव चौकात आंदोलकांनी जाळल्या गाड्या, अनेक बसेस जळून खाक

विशेष म्हणजे, आतापर्यंत 6 आमदारांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवलीय. मात्र प्रत्यक्षात औरंगाबादच्या कन्नड मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवलाय. तर इतर पाच आमदारांचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे पोहोचलाच नसल्याची माहिती समोर आलीय.मराठा आरक्षणाच्या अध्यादेशासाठी राष्ट्रवादीचे भाऊसाहेब चिकटगावकर आणि रमेश कदम भाजपच्या सीमा हिरे आणि राहुल आहेर, तसंच काँग्रेसचे भारत भालके यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवलीय. त्यानुसार राजीनामा देण्यासाठी आमदारांनी स्वतः विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवणं अपेक्षित असतं. मात्र हर्षवर्धन जाधव सोडून आणखी कोणत्याही आमदारांनी ते धाडस दाखवलेलं नाही.

चाकणमध्ये मराठा आंदोलन हाताबाहेर, 25 पेक्षा जास्त गाड्या जाळल्या

दरम्यान, आज पुण्यात चाकण परिसरात आंदोलकांनी जबरदस्त तोडफोड केली आहे. तब्बल 100 ते 150 गाड्या आंदोलकांनी फोडल्या आहे. तर 25 पेक्षा जास्त गाड्या पोलिसांकडून जाळण्यात आल्या आहे. पुण्यातल्या चाकण जवळच्या तळेगाव चौकात आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी दिसेल त्या गाड्या पेटवून दिल्या आहे. यात मोठ्या प्रमाणात खासगी गाड्यांचा समावेश आहे. तर एसटी बसेसलाही आंदोलकांनी आग लावली आहे. काही बसेस तर जळून खाक झाल्या आहेत. हंडेवाडी परिसरात आंदोलकांनी टायर्स जाळून रास्ता रोको केला आहे. खेड, चाकण आणि एमआयडीसी परिसरातील आंदोलकांनी हे तीव्र आंदोलन केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 30, 2018 04:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close