'काँग्रेस'साठी धोक्याची घंटा, या आमदाराने दिल्या CMना वाढदिसाच्या शुभेच्छा

'काँग्रेस'साठी धोक्याची घंटा, या आमदाराने दिल्या CMना वाढदिसाच्या शुभेच्छा

राज्यातलं राजकीय वातावरण आणि आगामी विधानसभा निवडणुका यामुळे मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी इतर पक्षांचे कोण नेते जातात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.

  • Share this:

सागर कुलकर्णी, मुंबई 22 जुलै : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी होणं हे तसं काही नवीन नाही. महाराष्ट्रातली राजकीय संस्कृती उदार असल्याने सर्वच पक्षांचे नेते एकमेकांना शुभेच्छा आणि सदिच्छा देत असतात. पण राज्यातलं राजकीय वातावरण आणि आगामी विधानसभा निवडणुका यामुळे मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी इतर पक्षांचे कोण नेते जातात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. यात लक्ष वेधून घेतलं ते काँग्रेसचे आमदार आणि प्रतोद जयकुमार गोरे यांनी. त्यांनी 'सह्याद्री' अतिथिगृहात जाऊन मुख्यमंत्र्यांना खास शुभेच्छा दिल्या आणि राजकीय चर्चेला सुरुवात झाली.

माण खटावचे आमदार असलेले गोरे हे भाजपात जातील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यात  गोरे यांनी आज सीएम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यामुळे काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा असल्याचं बोललं जातं. मुख्यमंत्र्यांनी रविवारी भाजप कार्यकारिणीत बोलताना जे भाजपमध्ये येतील त्यांचं स्वागत करू असं म्हटलं होतं.

धमक्या देऊ नका, नाही तर माज उतरवणार; शिवसेनेच्या मंत्र्याची भाजपला धमकी

मुख्यमंत्र्यांची 'महाजनादेश' यात्रा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभा निवडणुकीकरता अवघं राज्य पिंजून काढणार आहेत. आचारसंहिता लागण्याच्या आधी ते 'महाजनादेश यात्रे'च्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या बहुतांश मतदारसंघात जाणार असून सरकारची कामं जनतेसमोर ठेवणार आहेत. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे सुद्धा सध्या महाराष्ट्राच्या यात्रेवर असून 'जन आशीर्वाद' यात्रेच्या माध्यमातून ते लोकांशी संवाद साधत आहेत.

फडणविसांचा शिवसेनेला दणका, मुख्यमंत्रिपदाच्या वादावर दिलं उत्तर

मुख्यमंत्र्यांच्या 'महाजनादेश यात्रे'ची सुरुवात  1 ऑगस्टला तुकडोजी महाराजांच्या भूमीतून म्हणजे अमरावतीत जिल्ह्यातल्या गुरुकुंज मोझरी येथून होणार आहे. तर समारोप नाशिक इथे 31ऑगस्टला होणार आहे. अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षाच्या दिवशी या यात्रेचा प्रारंभ होणार आहे. ही यात्रा 25 दिवस, मुंबई वगळता 30 जिल्ह्यांमध्ये जाणार आहे. यात 152 मतदार संघांचा समावेश असणार असून 300 पेक्षा जास्त सभा यात मुख्यमंत्री घेणार आहेत. यात 104 जाहीर सभा, 228 स्वागत सभा आणि 20 पत्रकार परिषदा घेतल्या जाणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 22, 2019 03:45 PM IST

ताज्या बातम्या