मुंबईत काँग्रेसची बैठक, गटनेते पदासाठी 'या' नावांची चर्चा

मुंबईत काँग्रेसची बैठक, गटनेते पदासाठी 'या' नावांची चर्चा

आजच्या बैठकीत आमदारांकडून असा ठराव मंजूर करण्यात आला आहे. काँग्रेस विधीमंडळ गटनेता निवडीचा अधिकार राहुल गांधी यांच्याकडून अंतिम होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 20 मे : विधीमंडळ गटनेता निवडीसाठी सोमवारी काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये 3 नावांवर चर्चा करण्यात आली आहे. मुंबईत काँग्रेस विधीमंडळ गटनेता निवडीसाठी बैठक पार पडली. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विजय वड्डेटीवार आणि वर्षा गायकवाड यांच्या नावाची बैठकीत चर्चा झाल्याच समजतं आहे.

गटनेत्याची निवड करण्यासाठी अंतिम निर्णय हा दिल्लीत हायकमांडकडून घेतला जाणार आहे. आजच्या बैठकीत आमदारांकडून असा ठराव मंजूर करण्यात आला आहे. काँग्रेस विधीमंडळ गटनेता निवडीचा अधिकार राहुल गांधी यांच्याकडून अंतिम होणार आहे. मल्लिकार्जून खरगे यांनी यासंबंधी प्रत्येक आमदारांशी चर्चा केली.

आजच्या बैठकीत सध्याची राजकीय स्थिती, कोण गटनेता असावा यावर चर्चा करण्यात आली. येणारी विधानसभा निवडणूकीची तयारी यानुसार केली जाईल अशी माहिती काँग्रेस आमदार नसीम खान यांनी दिली.

काग्रेस विधीमंडळ गटनेते पदासाठी नावांची चर्चा  

बाळासाहेब थोरात

- काँग्रेस ज्येष्ठ नेते, माजी महसूल कृषी मंत्री

- पाच वेळेपेक्षा जास्त आमदार टर्म

- मराठा चेहरा, भ्रष्टाचाराच्या आरोप नाही

- विखे यांना पर्याय म्हणून थोरात यांना प्राधान्यान

- एनसीपी नेत्यासमवेत जुळवून घेत काम करण्याची कसब

बाळासाहेब थोरात यांची कमतरता

- आक्रमक कमी

- महाराष्ट्रात सर्वदूर प्रभाव कमी

हेही वाचा : बीड मतदारसंघाचा निकाल लागणार उशिरा, हे आहे कारण

विजय वड्डेटीवार

- विदर्भातील आमदार

- आक्रमक भूमिका मांडणारा नेता

- अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय

विजय वड्डेटीवार यांची कमतरता

- वड्डेटीवार नको तितके आक्रमक

- नारायण राणे समवेत काँग्रेस पक्षात आले. मूळ शिवेसना आहे. त्यामुळे हायकमांड नेमका किती विश्वास ठेवणार याविषयी शंका

- वड्डेटीवार यावर काँग्रेस अंतर्गत विदर्भात काही आमदार नाराज

वर्षा गायकवाड

- माजी कॅबिनेट मंत्री

- महिला, दलित चेहरा म्हणून पक्षात ओळख

- गुजरात, मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीत चांगली जबाबदारी

- दिल्लीत नवीन तरुण टीम म्हणून ओळख

- काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ घराणे

- माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या कन्या

वर्षा गायकवाड यांची कमतरता

- गायकवाड विधीमंडळात विरोधी बाकावर आक्रमक नेते म्हणून ओळख नाही

- एनसीपी आणि काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यासमवेत काम करून घेणे कठीण

- शहरी चेहरा असल्याने महाराष्ट्रात ग्रामीण नेतृत्व उभे राहणे थोडे कठीण


VIDEO : शरद पवारांनी मागितली 'अल्लाह ताला से दुआ'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Congress
First Published: May 20, 2019 09:58 PM IST

ताज्या बातम्या