News18 Lokmat

LokSabha Elections : काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, हे आहेत महाराष्ट्रातील 5 उमेदवार

मुंबई दक्षिणमधून मिलिंद देवरा, उत्तर मध्य मुंबईतून प्रिया दत्त, सोलापूरमधून सुशील कुमार शिंदे आणि गडचिरोलीतून डॉ.नामदेव उसेंडी यांनाही उमेदवारी करण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 13, 2019 09:27 PM IST

LokSabha Elections : काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, हे आहेत महाराष्ट्रातील 5 उमेदवार

नवी दिल्ली, 13 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातून 5 नावं जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये नागपूरमधून नाना पटोले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नागपूर हा भाजपचे नेते आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे नागपूरमध्ये नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले अशी मोठी लढत पाहण्यास मिळणार आहे. तसंच मुंबई दक्षिणमधून मिलिंद देवरा, उत्तर मध्य मुंबईतून प्रिया दत्त, सोलापूरमधून सुशील कुमार शिंदे आणि गडचिरोलीतून डॉ.नामदेव उसेंडी यांनाही उमेदवारी करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील उमेदवारांची नावं

नागपूर- नाना पाटोले

गडचिरोली- नामदेव मुसंडी

मुंबई उत्तर-मध्य - प्रिया दत्त

Loading...

दक्षिण मुंबई - मिलिंद देवरा

सोलापूर- सुशिलकुमार शिंदे

दरम्यान, काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत एकूण 21 नावे जाहीर करण्यात आली आहेत. यातील महाराष्ट्रातील 5 तर उत्तर प्रदेशमधील 16 जणांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशमध्ये मोरादाबादमधून राज बब्बर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याशिवाय सुल्तानपुरमधून संजय सिंह यांना दिली आहे. या मतदारसंघातून त्यांना भाजपचे उमदेवार वरुण गांधी यांच्याशी लढत द्यावी लागणार आहे.

उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचे उमेदवार

नगीना-ओमवती देवी जथाव

खेडी- जफर अली नकवी

सीतापूर- कैसर जहान

मिसरीख- मंजरी राही

मोहनलालगंज- रामशंकर भार्गव

प्रतापगढ- रत्ना सिंह

कानपुर- श्रीप्रकाश जायसवाल

फतेहपूर- राकेश सचन

बहराइच- सावित्री फुले

लालगंज- पंकज मोहन सोनकर

मिर्जापुर- ललितेश पति त्रिपाठी

रॉबर्ट्सगंज- भगवती प्रसाद चौधरी

लोकसभा निवडणुक 2019

लोकसभा निवडणुकांच्या (LokSabha Elections 2019) तारखा जाहीर झाल्या आहेत. देशभरात सात टप्प्यांमध्ये 11 एप्रिल ते 19 मे यादरम्यान निवडणुका होतील. नवी दिल्लीमध्ये रविवारी निवडणूक आयोगाने (Election Commission) या तारखांची घोषणा केली. देशात सात टप्प्यांत तर महाराष्ट्रात चार टप्प्यांत लोकसभा निवडणुका होतील.

11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान होणार-

वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा- गोदिया, गडचिरोली- चिमूड, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम

18 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 10 जागांवर होणार मतदान-

बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर

23 एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 14 जागांवर होणार मतदान

जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदूर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

29 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 17 जागांवर होणार मतदान

नंदूरबार, धुळे दिंडोरी, नाशिक, पालघर, भिंवडी, कल्याण, ठाणे, मुंबई- उत्तर, मुंबई- उत्तर- पश्चिम, मुंबई -उत्तर - पूर्व, मुंबई- उत्तर -मध्य, मुंबई - दक्षिण - मध्य, मुंबई- दक्षिण, मावळ, शिरूर, शिर्डी

लोकसभा निवडणूक 2014

महाराष्ट्रात 2014 च्या निवडणुकीत भाजप - शिवसेना युती आणि काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी अशी सरळ स्पर्धा होती. राज्यातल्या लोकसभेच्या 48 जागांपैकी 41 जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात भाजप- सेना युतीने जिंकल्या आणि काँग्रेस आघाडीचा सपशेल पराभव झाला. काँग्रेसला फक्त 2 जागा जिंकता आल्या तर राष्ट्रवादीने केवळ 4 जागा राखल्या.

महाराष्ट्र 2014 चं पक्षीय बलाबल

एकूण जागा 48

भाजप 23

सेना 18

राष्ट्रवादी काँग्रेस 4

काँग्रेस 2

स्वाभिमानी शेतकरी पक्ष 1

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 13, 2019 09:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...