मुख्यमंत्र्यावरील प्रेम कमी होईना, काँग्रेसचे 'पाटील' कुटुंब वर्षा बंगल्यावर

मुख्यमंत्र्यावरील प्रेम कमी होईना, काँग्रेसचे 'पाटील' कुटुंब वर्षा बंगल्यावर

काँग्रेस नेत्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यावरील प्रेम कमी होत नसल्याचे दिसत आहे. काँग्रेस नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी 'वर्षा' बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेतली.

  • Share this:

मुंबई, 25 जुलै- काँग्रेस नेत्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यावरील प्रेम कमी होत नसल्याचे दिसत आहे. काँग्रेस नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी 'वर्षा' बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेतली. हर्षवर्धन पाटील यांनी लिहिलेले पुस्तक 'विधानगाथा'चा प्रकाशन सोहळा होत आहे. या सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी पाटील कुटुंबाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. हर्षवर्धन पाटील यांची कन्या आणि जिल्हा परिषद सदस्य अंकिता पाटील यांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.

काँग्रेस-राष्ट्रवादीत या जागेवरून कलह..

इंदापूर विधानसभा मतदारसंघावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत राजकीय कलह सुरू आहे. त्यातच हर्षवर्धन पाटील यांचे मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी फोटो मुद्दाम सोशल मीडियात पाठवत दबावाचे राजकारण खेळले जात आहे.

हर्षवर्धन पाटलांनी केली होती दत्तात्रय भरणेंवर टीका...

एकीकडे उजनीचे पात्र, दुसरीकडे नीरा डावा व खडकवासला कालवा असूनही इंदापूरला दुष्काळाच्या झळा जाणवत आहेत. तालुक्‍यात 60 टॅंकरने पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. 12 छावण्या सुरू आहेत. उजनीच्या पाण्यावर नियंत्रण नसल्याने पिके जळून गेली आहेत. इंदापूर तालुक्‍याचे आमदार सक्षम नसल्यानेच तालुक्‍यात दुष्काळाच्या झळा जाणवत असल्याची टीका हर्षवर्धन पाटील यांनी विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांचे नाव न घेता केली. यावेळी परिवर्तन करण्याची गरज असल्याचे सांगत 2014 मध्ये केलेली चूक पुन्हा करू नका, असे आवाहनही पाटील यांनी केले.

पाटील म्हणाले की, आमदारांचा प्रशासनावर वचक राहिलेला नाही. उजनीच्या पाण्यावर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. लोकसभा निवडणुकीच्या काळात उजनी धरणातून पाणी सोडण्यात आल्याने धरणग्रस्तांचे प्रपंच उद्‌ध्वस्त झाले. गाळमोरीतून पाणी सोडण्याचे अधिकार केवळ कॅबिनेटला असताना अधिकारी मात्र कोणाच्याही सांगण्यावरुन पाणी सोडून देतात. या पाण्यासाठी कायदेशीर लढा उभारायला हवा आणि याकरीता आपण तयार आहोत.

VIDEO:फुटपाथवरून जात होती महिला, अचानक उघड्या गटारात पडली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 25, 2019 08:40 PM IST

ताज्या बातम्या