सुभाष धोटेंचा अखेर राजीनामा, विद्यार्थिनींवरील अत्याचारप्रकरणी केले असंवेदनशील वक्तव्य

पीडित मुलींचे पालक शासकीय मदतीसाठी तक्रारी करीत असल्याचे वक्तव्य विजय वडेट्टीवार, सुभाष धोटे व बाळू धानोरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन केले होते. या वक्तव्यावरुन संपूर्ण विदर्भात संतप्त पडसाद उमटले. त्यानंतर वडेट्टीवार यांनी दिलगिरी व्यक्त केली तर सुभाष धोटे यांनीही प्रसिद्धीपत्रक काढून जाहीर माफी मागितली आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 25, 2019 06:42 PM IST

सुभाष धोटेंचा अखेर राजीनामा, विद्यार्थिनींवरील अत्याचारप्रकरणी केले असंवेदनशील वक्तव्य

चंद्रपूर, 25 एप्रिल- चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुभाष धोटे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राजुरा येथील शाळेत आदिवासी विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणात असंवेदनशील वक्तव्य केल्याने सुभाष धोटेंवर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. अत्याचाराची घटना घडलेले वसतिगृह ज्या संस्थेचे अध्यक्षही धोटेच आहेत.

पीडित मुलींचे पालक शासकीय मदतीसाठी तक्रारी करीत असल्याचे वक्तव्य विजय वडेट्टीवार, सुभाष धोटे व बाळू धानोरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन केले होते. या वक्तव्यावरुन संपूर्ण विदर्भात संतप्त पडसाद उमटले. त्यानंतर वडेट्टीवार यांनी दिलगिरी व्यक्त केली तर सुभाष धोटे यांनीही प्रसिद्धीपत्रक काढून जाहीर माफी मागितली आहे.

काय आहे प्रकरण?

राजुरा येथील एका खासगी शिक्षण संस्थेच्या वसतिगृहातील अल्पवयीन आदिवासी मुलींवर अत्याचार झाला होता. याप्रकरणी असंवेदनशील वक्तव्य करणे सुभाष धोटे यांच्यासह काँग्रेसच्या तीन बड्या नेत्यांच्या चांगलेच अंगाशी आले आहे. सुभाष धोटे यांच्यासह इतरांवर येथील रामनगर पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. आमदार विजय वडेट्टीवार, धोटे व लोकसभेचे उमेदवार बाळू धानोरकर यांना असंवेदनशील वक्तव्याबद्दल राज्य महिला आयोगानेही नोटीस बजावली आहे. 30 एप्रिलपर्यंत प्रत्यक्ष हजर राहून खुलासा करण्याचे निर्देशही दिले आहेत. या लैंगिक अत्याचार प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी मर्दानी महिला आस्था मंचच्या अध्यक्ष आणि माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी केली.

आदिवासी बांधव संतप्त

Loading...

13 एप्रिल रोजी आदिवासी विद्यार्थिनींवर अत्याचाराची घटना उघडकीस आली. या प्रकरणी न्यायालयाने दोन महिलांसह पाच जणांना 25 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राजुरा येथे संतप्त आदिवासी बांधवांनी काढलेल्या मोर्चातील जनभावना लक्षात घेता दाखल केलेल्या याचिकेवर नागपूर खंडपीठाने चंद्रपूर जिल्हा न्यायाधीश अंसारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली असून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी एसआयटी गठित केली आहे.

VIDEO : 'दार तोडून घरात आले आणि माझ्या भाच्याला, भावजाईला मारलं'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 25, 2019 06:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...