केडगावतल्या 2 शिवसैनिक हत्या प्रकरणात काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला अटक

केडगावतल्या 2 शिवसैनिक हत्या प्रकरणात काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला अटक

हमदनगर केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकारणात काँग्रेसचा नगरसेवक विशाल कोतकर याला पोलिसांनी अटक केली आहे. रात्रीच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली आहे.

  • Share this:

24 एप्रिल : अहमदनगर केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकारणात काँग्रेसचा नगरसेवक विशाल कोतकर याला पोलिसांनी अटक केली आहे. रात्रीच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली आहे. विशाल कोतकर याच्या सांगण्यावरून खून झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याच संदर्भात त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. कामरगाव परिसरातून त्यांना करण्यात आली आहे.

मुख्य मारेकरी संदीप गुंजाळने विशाल कोतकरच्या सांगण्यावरुन हे हत्याकांड झाल्याचं तपासात सांगितलं होतं. विशाल कोतकर हा हत्याकांडात संशयित मुख्य सूत्रधार असल्याचीही चर्चा आहे. आतापर्यंत या हत्याकांडात 9 जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

आरोपी संदीप गुंजाळ, बाबासाहेब केदार, संदीप गि-हे आणि महावीर मोकळे यांची पोलीस कोठडी गुरुवारी न्यायालयाने 21 एप्रिलपर्यंत वाढवली. खोल्लमला 24 एप्रिलपर्यंत कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

तसेच या हत्याकांडप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या आमदार संग्राम जगताप, बी. एम. कोतकर, बाळासाहेब कोतकर यांच्या कोठडीत दोन दिवसांची तर मुख्य आरोपी संदीप गुंजाळ याच्यासह बाबासाहेब केदार यांना 3 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.

काय आहे प्रकरण ?

अहमदनगरमधील शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ता वसंत ठुबे यांना केडगाव येथे भरचौकात गोळ्या घालून ठार मारण्यात आलं. केडगाव येथील सुवर्णनगर येथे ही घटना घडली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वसंत ठुबे आणि संजय कोतकर सुवर्णनगर परिसरात आले असता या दोघांवर गोळीबार केला गेला. गोळीबारानंतर हल्लेखोर फरार झाले. या घटनेची माहिती समजल्यावर आणि गोळ्यांचे आवाज ऐकल्यावर गोळीबार झालेल्या ठिकाणी लोक मोठ्या प्रमाणावर जमले. यानंतर परिसरातील दुकानदारांनी दुकाने बंद केली तर कोणीही घराबाहेर पडले नाही.

संबंधित बातम्या 

केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणी विशेष पोलीस तपास पथकाची स्थापना

अहमदनगर दुहेरी हत्या प्रकरण, पोलीस निरीक्षक अभय परमार यांचं निलंबन

केडगाव दुहेरी हत्याप्रकारणात राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगतापांसह 4 जणांना अटक

नगर जिल्ह्यात शिवसेनेचे उपप्रमुख कोतकर आणि कार्यकर्ता ठुबे यांची गोळ्या घालून हत्या

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 24, 2018 10:19 AM IST

ताज्या बातम्या