काँग्रेसमध्ये 'नवा भिडू नवा जोश', योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

काँग्रेसमध्ये 'नवा भिडू नवा जोश', योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी यांच्या अटकेचे वृत्त धडकताच काँग्रेसवाल्यांनी देशभर आंदोलन सुरू केले आहेत. मुंबईतही प्रदेश काँग्रेसचे नवनियुक्त पदाधिकारीही पहिल्यांदाच रस्त्यावर उतरल्याचे बघायला मिळाले.

  • Share this:

सागर कुलकर्णी,(प्रतिनिधी)

मुंबई, 19 जुलै- काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी या सोनभद्र हत्याकांडातील जखमींची भेट घेण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसवाल्यांनी देशभर आंदोलन सुरू केले आहेत. मुंबईतही प्रदेश काँग्रेसचे नवनियुक्त पदाधिकारीही पहिल्यांदाच रस्त्यावर उतरल्याचे बघायला मिळाले.

प्रियांका गांधींना अटक होताच काँग्रेस नेते मुंबईत रस्त्यावर उतरले आहेत. प्रदेश काँग्रेसने जोरदार आंदोलन सुरू केले आहे. युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे या वेळी दहन करण्यात आले. नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे देखील आंदोलनात सहभागी झाले आहेत.

तिकडे उत्तरप्रदेशात प्रियांका गांधींना अटक होताच देशभरात काँग्रेसवाल्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. इकडे मुंबईमध्ये तर नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात पहिल्यादांच रस्त्यावर उतरल्याचे बघायला मिळाले आहे. त्यांच्यासह इतर प्रदेश पदाधिकाऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. एवढेच नाहीतर युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचंही दहन करण्यात आले. भाजपचे सरकार सामान्यांचा आवाज दाबत असल्याचा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला.

काँग्रेसला सत्तेबाहेर जाऊन आता खरंतर पाच वर्षे लोटलीत. पण तरीही काँग्रेसवाले सरकारविरोधात एवढ्या द्वेषाने रस्त्यावर उतरल्याचे दृश्य अभावानेच बघायला मिळाले. त्याचाच परिपाक म्हणून गेल्या लोकसभेत काँग्रेसचा दारून पराभव झाला. म्हणूनच काँग्रेसने खालपासून वरपर्यंत बहुतांश पदाधिकारी बदलून टाकले आहेत. इकडे महाराष्ट्रातही संपूर्ण प्रदेश कमिटीच बदलण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र बाळासाहेब थोरात या नव्या दमाच्या नेतृत्त्वाकडे सोपवण्यात आली आहेत. त्यामुळे त्यांनीही पदाची सूत्र हाती घेताच रस्त्यावर उतरून पहिले आंदोलन केले आहे. अर्थात ते त्यांना भागच होते कारण प्रश्न शेवटी गांधी घराण्यातील व्यक्तीच्या अटकेचा होता.

नाशिकमध्येही निदर्शने...

प्रियांका गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ नाशिकमध्येही निदर्शने करण्यात आली. नाशिक जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने योगी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. योगी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांकड़ून कॉंग्रेस कार्यकर्त्यांना अटक केल्याचीही माहिती मिळाली आहे.

पाणी मागताच ग्रामसेवकानं दाखवलं पिस्तूल; VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 19, 2019 06:04 PM IST

ताज्या बातम्या