Elec-widget

रत्नागिरीचे काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांचे 'सनातन'शी संबंध ?

रत्नागिरीचे काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांचे 'सनातन'शी संबंध ?

काँग्रेसने जाहीर केलेले लोकसभेचे उमेदवार नवीनचंद्र बांदवडेकर हे सनातन संस्थेशी निगडित असल्याची चर्चा आहे. नालासोपारा बॉम्बस्फोट खटल्यातला आरोपी वैभव राऊत याला सोडवण्यासाठी जो मोर्चा काढण्यात आला होता त्यामध्ये नवीनचंद्र बांदिवडेकर हेही होते. त्यावरून वाद होण्याची चिन्हं आहेत.

  • Share this:

सागर कुलकर्णी

रत्नागिरी, 21 मार्च : काँग्रेसने जाहीर केलेले लोकसभेचे उमेदवार नवीनचंद्र बांदवडेकर हे सनातन संस्थेशी निगडित असल्याची चर्चा आहे. नालासोपारा बॉम्बस्फोट खटल्यातला आरोपी वैभव राऊत याला सोडवण्यासाठी जो मोर्चा काढण्यात आला होता त्यामध्ये नवीनचंद्र बांदिवडेकर हेही होते. त्यावरून वाद होण्याची चिन्हं आहेत.

नवीनचंद्र बांदिवडेकर हे भंडारी समाजाचे नेते आहेत. त्यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी हात जोडून पक्षात बोलवलं आणि रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघाची उमेदवारी दिली, अशी सूत्रांची माहिती आहे.

बांदिवडेकर यांनी वैभव राऊतला सोडवण्यासाठीच्या मोर्चामध्ये भाषण केलं होतं. वैभव राऊत हिंदुत्वाच्या रक्षणासाठी झटला, या शब्दात त्यांनी त्याचं कौतुक केलं होतं. त्यांचं हे वक्तव्य 'दैनिक सनातन प्रभात' मध्ये छापून आलं आहे.

अशा व्यक्तीला उमेदवारी दिल्याने काँग्रेसवर टीका होतेय. पण बांदिवडेकर आणि सनातन संस्थेचा संबंध नाही. बांदिवडेकर 'सनातन'ची विचारधारा आणि त्यांच्या समर्थकांच्या विरोधात आहेत आणि हा विरोध पुढेही कायम राहील, असं काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

Loading...

नवीनचंद्र बांदिवडेकर हे अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आपला पूर्ण समाज वैभव राऊतच्या पाठिशी आहे, त्याला न्याय मिळायला हवा, अशा शब्दात त्यांनी वैभव राऊतची पाठराखण केली होती.

याबदद्ल News 18 लोकमत ने नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्याशी संपर्क साधला. त्यावर वैभव राऊत हा भंडारी समाजाचा असल्याने मी त्याची पाठराखण केली, असं त्यांनी म्हटलं आहे. कोर्टाने त्याला दोषी ठरवलं तर त्याला आमचा पाठिंबा राहणार नाही, असंही ते म्हणाले.

दरम्यान, बांदिवडेकर यांना उमेदवारी देणं हे हिताचं ठरणार नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी News 18 लोकमत शी बोलताना दिली आहे.

ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये झालेल्या स्फोट प्रकरणी 'सनातन' संस्थेच्या सदस्यांना अटक झाली होती. त्याचप्रमाणे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेवर आरोप झाले आहेत, या संस्थेच्या साधकांना अटकही झाली आहे.


(ही बातमी अपडेट होत आहे.)




बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 21, 2019 07:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...