काँगेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांचा पत्ता कट ?

काँगेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांचा पत्ता कट ?

काँगेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांची उमेदवारी रद्द होणार, अशी शक्यता आहे. त्यांच्याऐवजी रमेश कीर यांना ही उमेदवारी मिळेल, असं बोललं जातंय.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी याबदद्ल एक ट्विट केलं होतं. त्यात त्यांच्याबद्दल योग्य निर्णय घेऊ, असं त्यांनी म्हटलं होतं.

  • Share this:

काँग्रेसचे रत्नागिरी – सिंधुदुर्गचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर हे सनातन संस्थेशी निगडित असल्याचा आरोप झाला होता.नालासोपारा बॉम्बस्फोट खटल्यातला आरोपी वैभव राऊत याला सोडवण्यासाठी जो मोर्चा काढण्यात आला होता त्यामध्ये नवीनचंद्र बांदिवडेकर हेही होते. त्यावरून हा वाद झाला.

नवीनचंद्र बांदिवडेकर हे भंडारी समाजाचे नेते आहेत. त्यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी हात जोडून पक्षात बोलवलं आणि रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघाची उमेदवारी दिली, अशी सूत्रांची माहिती आहे.

बांदिवडेकर यांनी वैभव राऊतला सोडवण्यासाठीच्या मोर्चामध्ये भाषण केलं होतं. वैभव राऊत हिंदुत्वाच्या रक्षणासाठी झटला, या शब्दात त्यांनी त्याचं कौतुक केलं होतं. त्यांचं हे वक्तव्य 'दैनिक सनातन प्रभात' मध्ये छापून आलं आहे.

अशा व्यक्तीला उमेदवारी दिल्याने काँग्रेसवर टीका होतेय. पण बांदिवडेकर आणि सनातन संस्थेचा संबंध नाही. बांदिवडेकर 'सनातन'ची विचारधारा आणि त्यांच्या समर्थकांच्या विरोधात आहेत आणि हा विरोध पुढेही कायम राहील, असं काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

नवीनचंद्र बांदिवडेकर हे अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आपला पूर्ण समाज वैभव राऊतच्या पाठिशी आहे, त्याला न्याय मिळायला हवा, अशा शब्दात त्यांनी वैभव राऊतची पाठराखण केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: congres
First Published: Mar 22, 2019 06:30 PM IST

ताज्या बातम्या