मुंबईतील एकमेव मराठमोळ्या 'दादर क्लब' विरोधात आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार

दादर (पूर्व) परिसरात असलेल्या एकमेव मराठमोळ्या अलिशान 'दादर क्लब'मध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार आर्थिक गुन्हे शाखेमध्ये नोंदवण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 27, 2019 08:26 PM IST

मुंबईतील एकमेव मराठमोळ्या 'दादर क्लब' विरोधात आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार

मुंबई, 27 जून- दादर (पूर्व) परिसरात असलेल्या एकमेव मराठमोळ्या अलिशान 'दादर क्लब'मध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार आर्थिक गुन्हे शाखेमध्ये नोंदवण्यात आली आहे. खरंतर गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यातच तक्रारदार राकेश शर्मा यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे ही तक्रार दाखल केली होती. मात्र, अलिकडेच तक्रारीची प्रत बाहेर आल्याने या प्रकरणाला वाचा फुटली आहे.

आर्थिक गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सगळ्या प्रकरणी चौकशीला हजर राहण्यासाठी क्लब व्यवस्थापनाला नोटीस बजावण्यात आली आहे. अशा प्रकारचे महागडे क्लब हे आता भ्रष्टाचाराचा नवा पायंडा पुढे आणताना दिसून येत आहे. जवळपास साठ वर्षांहून अधिक जुना असलेल्या या दादर क्लबमध्ये अनेक मराठी अभिनेते, लेखक, साहित्यिक, नामवंत खेळाडू, पत्रकार, राजकीय नेते हे सदस्य आहे आणि त्याचमुळे हे प्रकरणाने आता सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

दुसरीकडे, दादर क्लबचे अध्यक्ष अश्विन देखमुख यांन तक्रारदार राकेश शर्मा यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. राकेश शर्मा हे दादर क्लबचे सदस्य नाहीत. त्यांना क्लबविरोधात तक्रार देण्याचा अधिकार नाही.

राकेश शर्मा यांनी काय म्हटले आहे तक्रारीत..

राकेश शर्मा यांनी तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, 2007 ते 2013 दरम्यान क्लबच्या नव्या इमारतीच्या बांधकामाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यावेळी बांधकामाचा प्रस्तावित खर्च 14 कोटी रुपये होता. मात्र 2014 मध्ये ज्यावेळी इमारत पूर्ण झाली त्यावेळी हा खर्च 14 कोटींवरून 34 कोटी रुपयांवर गेला. एवढ्या प्रचंड प्रमाणात वाढलेले बजेट पाहून क्लबमध्ये गोंधळ उडाला. त्यानंतर एका त्रयस्थ कंपनीमार्फत या सगळ्या बांधकाम खर्चाचे ऑडिट करण्यात आले. ज्यामध्ये आर्थिक अनियमितता असल्याचा अहवाल त्रयस्थ कंपनीमार्फत देण्यात आला. मात्र, अंतिम अहवालाची सगळ्या सदस्यांना प्रतिक्षा आहे. यातच ज्या व्यवस्थापन समितीवर भ्रष्टाचाराचा आणि आर्थिक अनियमिततेचा आरोप करण्यात येत आहे, ते व्यवस्थापन समिती अंतिम अहवालासाठी अडथळे निर्माण करत असल्याचा सदस्यांचा आरोप आहे.

Loading...

सूडभावनेतून तक्रार- अश्विन देखमुख

दादर क्लबचे अध्यक्ष अश्विन देखमुख यांनी राकेश शर्मा यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. तक्रारदार राकेश शर्मा हे क्लबचे सदस्य नाहीत. त्यांनी सूडभावनेतून ही तक्रार केली आहे. राकेश शर्मा यांची पत्नी रेणुका शर्मा ह्या क्लबच्या सदस्या होत्या. मात्र,गेल्या वर्षी त्यांनी केलेल्या गैरवर्तवणुकीमुळे त्यांना निलंबित करण्यात आले होते. येत्या रविवारी (30 जून) दादर क्लबच्या कार्यकारिणीची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर राकेश शर्मा यांनी हे कटकारस्थान रचल्याचे अश्विन देखमुख यांनी म्हटले आहे. राकेश शर्मा यांनी सूडभावनेने यापूर्वी 'दादर क्लब' व्यवस्थानाविरोधात तक्रारी दिल्या होत्या. परंतु, राकेश शर्मा यांनी पुरावे सादर करता आली नाहीत. तसेच काही तक्रारी या अजूनही न्यायप्रविष्ट आहेत. आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीलाही सामोरे जाण्याची आमची तयारी असून कोण खरं आणि कोण खोटं, हे लवकरच समोर येईल, असे अश्विन देखमुख यांनी सांगितले आहे.

दरम्यान,अलीकडच्या काळात जसजशी लाईफस्टाईल बदलत आहे तसतशा मौजमजेचे पर्याय सुद्धा बदलताना दिसत आहे. सध्या एका विशिष्ट वर्गासाठी रिक्रिएशन क्लब हे सेकंड होम ठरत आहेत. मात्र, मोक्याच्या जागी असणाऱ्या क्लबची मेंबरशीप सुद्धा महागडी आहे. त्यामुळेच आता या क्लब संस्कृतीत सुद्धा भ्रष्टाचार शिरत असल्याचे दिसून येत आहे.

VIDEO:आजचा दिवस हा मराठा समाजासाठी ऐतिहासिक दिवस- संभाजी राजे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 27, 2019 08:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...