S M L

रस्त्यावर खड्डे खणले तर गणेश मंडळावर फौजदारी गुन्हा, पुणे पालिका आयुक्तांचा इशारा

"सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणाऱ्या मंडळांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल तसंच दंडही वसूल करण्यात येईल "

Sachin Salve | Updated On: Aug 11, 2017 05:00 PM IST

रस्त्यावर खड्डे खणले तर गणेश मंडळावर फौजदारी गुन्हा, पुणे पालिका आयुक्तांचा इशारा

अद्वैत मेहता, पुणे

11 आॅगस्ट : गणेश उत्सावाकरता रस्त्यावर मंडप टाकण्यासाठी खड्डे खणून सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणाऱ्या मंडळांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल तसंच दंडही वसूल करण्यात येईल अशी ग्वाही पुणे पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी दिलीय.

दुसरीकडे पर्यावरण स्नेही गणेश उत्सव साजरा करण्याकरता पुण्यातील 3000 विद्यार्थ्यांकडून शाडूच्या मूर्ती बनवण्याच्या उपक्रमासोबत प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मूर्तीच्या विसर्जन पटकन व्हावं याकरता अमोनियम कार्बोनेट ही पालिकेतर्फे पुरवण्यात येणार असून नागपूर पालिकेप्रमाणे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी आणण्याबाबत सकारात्मक प्रयत्न करू अशी ग्वाही महापौर मुक्ता टिळक यांनी दिली.

125 व्या गणेश उत्सवानिम्मित शनिवारी 12 ऑगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लोगो, थिम song रिलीज करणार असून 23 ऑगस्टला 5000 ढोलवादक गिनीजबुकमध्ये विक्रम नोंदवण्यासाठी वादन करणार आहेत अशी माहितीही महापौर यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 11, 2017 05:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close