पिंपरी चिंचवडमध्ये एकाच ठिकाणी दिवसा कॉलेज आणि रात्री हॉटेल

का शैक्षणिक संस्थेवर राज्याचा शिक्षण विभाग फारच मेहरबान असल्याची बाब पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आलीय. तर राजरोसपणे सुरू असलेल्या याप्रकाराबाबत, तक्रार केल्यानंतर आपल्याला धमकावल जात असल्याचंही, त्या शिक्षणसंस्थेतील विद्यार्थ्याचं म्हणणं आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Nov 12, 2017 01:30 PM IST

पिंपरी चिंचवडमध्ये एकाच ठिकाणी दिवसा कॉलेज आणि रात्री हॉटेल

पुणे,12 नोव्हेंबर: सकाळी कॉलेज आणि रात्री त्याच ठिकाणी, हॉटेल व्यवसाय थाटला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एका शैक्षणिक संस्थेवर राज्याचा शिक्षण विभाग फारच मेहरबान असल्याची बाब पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आलीय. तर राजरोसपणे सुरू असलेल्या याप्रकाराबाबत, तक्रार केल्यानंतर आपल्याला धमकावल जात असल्याचंही, त्या शिक्षणसंस्थेतील विद्यार्थ्याचं म्हणणं आहे.

अस्ता व्यस्त पडलेल्या सिगारेट आणि उरलेल्या अन्नाची तुकडे, दारूच्या बाटल्यांचा हा खच, बैठकीसाठीची ही आसन व्यवस्था ,सुसज्ज बिछाना आणि खासगी समारंभ, अशी दृश्य बघून एखाद्याला वाटेल हे कुठलंतरी हॉटेल आहे. मात्र अशाच हॉटेलच्या ठिकाणी दिवसा जानकी देवी महाविद्यालयही चालवलं जात. याशिवाय इथे काय प्रकार चालतात त्याबाबतही विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे.

यावर विचारलं असता आपण हॉटेलिंग करतो मात्र त्याचा आणि महाविद्यालयाचा काहीही संबंध नाही, शिवाय त्यासाठी शिक्षण विभागानेच आपल्याला मान्यता दिल्याचं अजब उत्तर, महाविद्यालयाच्या संचालिकेने दिलंय. या शिक्षण संस्थेला मान्यता दिलीच कशी गेली या प्रश्नाचं उत्तर आता शिक्षण विभागाला द्यावंच लागेल , किंवा शिक्षण क्षेत्रातील अशा सावळ्या गोंधळालाही आपणच मान्यता देतो हे तरी अभ्यासू म्हणून घेणाऱ्या शिक्षण मंत्र्यानी मान्य करायला काहीच हरकत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 12, 2017 01:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...