नैसर्गिक संकटामुळं नारळ बागायतीवर परिणाम; आता नारळ महागणार!

गेल्या काही महिन्यांपासून किनारपट्टीवर नारळाचं उत्पादन घटलंय. सुरुवातीला ओखी वादळ आणि त्यानंतर नारळाच्या झाडांना लागलेल्या वेगवेगळ्या रोगराईमुळं नारळाच्या उत्पादनात निम्म्यानं घट झाल्याची माहिती पुढं येतं आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 15, 2018 10:01 AM IST

नैसर्गिक संकटामुळं नारळ बागायतीवर परिणाम; आता नारळ महागणार!

रत्नागिरी, 15 जानेवारी : 'कोकणात नारळ फुकट' अशी म्हण पूर्वीच्या काळी प्रचलित होती. पण गेल्या काही दिवसात कोकणात नारळ पिकावर आलेल्या नैसर्गिक संकटामुळं नारळ बागायतदार संकटात सापडला आहे. किनारपट्टीवरील सर्वसामान्य ग्राहकांच्या आहारातलं हे फळ आता महाग झालं आहे. कोकण किनारपट्टीवर माडांच्या विस्तीर्ण बागा आहेत. इथं पिकणारा नारळ कोकणातल्या आणि मुंबईकरांच्या रोजच्या आहारातली गरज भागवतो. पण गेल्या काही महिन्यांपासून किनारपट्टीवर नारळाचं उत्पादन घटलंय. सुरुवातीला ओखी वादळ आणि त्यानंतर नारळाच्या झाडांना लागलेल्या वेगवेगळ्या रोगराईमुळं नारळाच्या उत्पादनात निम्म्यानं घट झाल्याची माहिती पुढं येतं आहे.

नारळावर करपा, एरिओफाईड कोळी, डिंक्या यासारख्या अनेक कीड-रोगांनी नारळ पिकाचं 50 टक्क्यांपर्यंत उत्पादन घटलं आहे. त्यामुळं कोकणातच सध्या नारळाच्या किमती 12 ते 15 रुपयांवरून 18 ते 20 रुपयांवर गेल्या आहेत. शहरात त्यामध्ये आणखी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय.

यंदा कोकणात किमान 30 ते 40 टक्के नारळ उत्पादन घटलेलं आहे. त्याचवेळी दक्षिणेतून येणारा नारळही महाग पडतोय. त्यामुळं येणाऱ्या वर्षभरात नारळ सर्वसामान्यांसाठी महाग होणार असल्याचं स्पष्ट होतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 15, 2018 10:01 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...