पुण्यात 49 लाख रुपयांचे कोकेन जप्त, नायजेरीयन नागरिकाला अटक

पुण्यात 49 लाख रुपयांचे कोकेन जप्त, नायजेरीयन नागरिकाला अटक

पोलीसांनी अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका नायजेरीयन नागरिकाला अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे 49 लाख रुपये किमतीचे 488 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे.

  • Share this:

पुणे, 28 जून- पोलीसांनी अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका नायजेरीयन नागरिकाला अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे 49 लाख रुपये किमतीचे 488 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर आठ लाख रुपये रोकड, विदेशी मद्याच्या बाटल्या आणि होंडा सीआरव्ही कार असा एकूण 63 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

फॉलरीन अब्दुल अजिज अन्डोई असे या अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या नायजेरीयन नागरिकाचे नाव आहे. पुण्यातील बाणेरमध्ये तो राहात होता. बाणेर-औंध परिसरात पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली आहे.

याआधी 2013 मध्येही आरोपीवर अंमली पदार्थांच्या विक्री प्रकरणी कारवाई झाली होती. त्यात त्याला चार वर्षे कारवासाची शिक्षा झाली होती. शिक्षा संपल्यानंतर तो पुन्हा अंमली पदार्थांच्या विक्रीत उतरला होता. पोलीस अनेक दिवसांपासून त्याच्या मागावर होते, अशी माहिती अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे यांनी दिली आहे.

मामाच्या मुलीला का छेडतो.. जाब विचारणाऱ्या तरुणावर शस्त्राने केले 42 वार

मामाच्या मुलीला का छेडतो, असा जाब विचारणाऱ्या तरुणावर धारदार शस्त्राने तब्बल 42 वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. आकाश काकडे (वय-22) असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे. पुण्याच्या येरवडा परिसरात मच्छी मार्केटमध्ये गुरुवारी रात्री 11 च्या सुमारास ही घटना घडली आहे.

किरकोळ वादातून सुरू झालेल्या हाणामारीचे पर्यवसन हत्येत झाल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. आकाशच्या मामाच्या मुलीला घटनेतील काही आरोपी छेडत होते. याबाबत जाब विचारण्यासाठी आकाश आणि त्याचा जुळा भाऊ विकास आरोपींकडे गेले होते. आकाश आणि आरोपींमध्ये त्यावेळी बाचाबाची झाली. मात्र, रात्री हा वाद मिटवण्याच्या उद्देशाने आरोपींनी आकाशला बोलवून घेतले. आकाश येताच त्याच्यावर पाच ते सहा जणांनी हल्ला केला. मारेकऱ्यांनी आकाशवर धारदार शस्त्राने तब्बल 42 वार केले. त्यात आकाशचा जागीच मृत्यू झाला. याबाबत येरवडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे. त्यातील तीन आरोपी अल्पवयीन आहेत.

वाहनाच्या धडकेत पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

पुण्यात फातीमानगरला क्रोम मॉल चौकात भीषण अपघातात पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. पालखी बंदोबस्त लावण्यासाठी निघालेल्या लष्कर पोलीस स्टेशनचे डिओ मिलींद मकासरे यांच्या डोक्यावरुन अज्ञात वाहनाचे चाक गेले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. शु्क्रवारी पहाटे 5 वाजता ही घटना घडली.

गच्चीतून पडलेल्या चिमुकलीसाठी 'तो' ठरला देवदूत; VIDEO VIRAL

First published: June 28, 2019, 7:39 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading