News18 Lokmat

मनोहर पर्रीकर उपचारासाठी अमेरिकेत जाण्याची शक्यता; व्हिडिओद्वारे मागितले सगळ्यांचे आभार

तुम्ही प्रार्थना सुरूच ठेवाल आणि मला काही दिवस उपचारांसाठी सुट्टी मंजूर कराल अशी आशा ठेवतो', अशा शब्दांत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सोमवारी प्रथमच व्हिडीओद्वारे आपलं म्हणणं गोव्यातल्या जनतेसमोर मांडलं आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Mar 6, 2018 09:09 AM IST

मनोहर पर्रीकर उपचारासाठी अमेरिकेत जाण्याची शक्यता; व्हिडिओद्वारे मागितले सगळ्यांचे आभार

06 मार्च : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सोमवारी रात्री उपचारासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, 'तुम्हा लोकांनी माझ्यासाठी पंधरा दिवस प्रार्थना केली. मला आशीर्वाद दिले. त्यामुळे मी बरा झालो. मी पहिल्या चेअकअपसाठी मुंबईला जात आहे. मी पूर्ण बरा होण्यासाठी कदाचित डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर विदेशातही जाईन. तुम्ही प्रार्थना सुरूच ठेवाल आणि मला काही दिवस उपचारांसाठी सुट्टी मंजूर कराल अशी आशा ठेवतो', अशा शब्दांत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सोमवारी प्रथमच व्हिडीओद्वारे आपलं म्हणणं गोव्यातल्या जनतेसमोर मांडलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून मनोहर पर्रीकर यांचा हा व्हिडिओ संवाद सर्वत्र पाठविण्यात आला आहे. गेल्या सतरा दिवसांत मनोहर पर्रीकर यांनी प्रथमच अशाप्रकारे संवाद साधला. या सगळ्यात मनोहर पर्रीकर यांच्यासोबत त्यांचे मोठे पुत्र उत्पल पर्रीकर हे सुद्धा मुंबईला गेले आहेत. या संदर्भात मनोहर पर्रीकर यांच्या ट्विटर अकाऊंटवरूनही माहिती देण्याच आली आहे.

मनोहर पर्रीकर यांनी सोमवारी सकाळी आपल्या दोनापावल येथील निवासस्थानी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, सगळे मंत्री, भाजपचे आमदार, वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्याशी संवाद साधला. उपसभापती मायकल लोबो हेही मनोहर पर्रीकर यांच्यासोबत वीस मिनिटे होते. मनोहर पर्रीकर खास प्रायव्हेट विमानाने मुंबईला आले आहेत.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 6, 2018 09:09 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...