चुकीच्या अंदाजामुळे मुख्यमंत्री हवामान खात्यावर नाराज, थेट केंद्राला पत्र

पावसाबद्दलचा चुकीचा अंदाज वर्तवल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट केंद्र सरकारला नाराजीचं पत्रं लिहिलंय. 29 ऑगस्टला मुंबई आणि परिसरमध्ये सरासरी 300 मिमी पाऊस झाला होता.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Sep 14, 2017 03:02 PM IST

चुकीच्या अंदाजामुळे मुख्यमंत्री हवामान खात्यावर नाराज, थेट केंद्राला पत्र

मुंबई, 14 सप्टेंबर : पावसाबद्दलचा चुकीचा अंदाज वर्तवल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट केंद्र सरकारला नाराजीचं पत्रं लिहिलंय. 29 ऑगस्टला मुंबई आणि परिसरमध्ये सरासरी 300 मिमी पाऊस झाला होता. यामुळे लोकल सेवेचा बोजवारा उडाला होता, रस्ते वाहतूकही ठप्प झाली होती. त्याच दिवशी हवामान विभागाने पुढील 24 तासांत म्हणजे 30 ऑगस्टला पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. याच हवामान अंदाजाचा आधार घेऊन राज्य सरकारने जवळपास अघोषित शासकीय सुट्टीच जाहीर केली होती.

सरकारी कार्यालयातील अत्यावश्यक आणि महत्त्वाच्या सरकारी विभागातील कर्मचा-यांनीच हजर रहावे असे आदेशच सरकारने काढले दिले होते. त्यामुळे 30 ऑगस्टला मुंबई आणि परीसरातील अनेक सरकारी कार्यलयात शुकशुकाट होता. मुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेता शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनीही 30 ऑगस्टला मुंबईतील सर्व शाळा - महाविद्यालये यांना सुट्टी जाहीर केली होती. प्रत्यक्षात मात्र 30 ऑगस्टला पावसाने तुरळकच हजेरी लावली, दिवसभर लख्ख ऊन पडले होते. थोडक्यात हवामान विभागाचा 30 ऑगस्टचा मुसळधार पावसाचा अंदाज साफ चुकला होता.

थोडक्यात हवामान विभागाच्या चुकीच्या अंदाजामुळे शासकीय कामाचा एक दिवस नाहक वाया गेला. म्हणूनच मुख्यमंतत्र्यांनी या चुकीच्या हवामान अंदाजाविरोधात नाराजी व्यक्त करणारं एक खरमरीत पत्रं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री डॉ हर्षवर्धन यांना लिहिलंय. त्यात त्यांनी हवामान विभागाच्या चुकीच्या अंदाजामुळे शासकीय कामकाजाचा एक दिवस वाया गेल्याचं म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 14, 2017 02:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...