'इंदू सरकार'मध्ये मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा - विखे पाटील

'इंदू सरकार'मध्ये मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा - विखे पाटील

मधुर भंडारकर यांनी दिग्दर्शित केलेल्या इंदू सरकार चित्रपटात इतिहासाचा विपर्यास झाल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

  • Share this:

08 जुलै : इंदू सरकारप्रकरणी आता नवा वाद निर्माण होतोय की काय असे चिन्ह दिसतायेत. मधुर भंडारकर यांनी दिग्दर्शित केलेल्या इंदू सरकार चित्रपटात इतिहासाचा विपर्यास झाल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

आपल्या पत्रात विखे पाटील यांनी नमूद केले आहे की, या चित्रपटाची कथा दिवंगत पंतप्रधान इंदिराजी गांधी आणि काँग्रेस नेते स्व. संजय गांधी यांच्या जीवनाशी संबंधीत असल्याचे दिसून येते. परंतु, सदरहू चित्रपटामध्ये वस्तुस्थितीशी विसंगत अशा पद्धतीने काही घटनांचे सादरीकरण असल्याची चर्चा आहे.

या चित्रपटात इतिहासाचा विपर्यास करण्याची शंका खरी ठरली तर प्रेक्षकांच्या भावना दुखावून तीव्र प्रतिक्रिया उमटू शकतात.संभाव्य वाद टाळण्याच्या हेतूने प्रदर्शनापूर्वी हा चित्रपट संबंधितांना दाखवण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 8, 2017 06:03 PM IST

ताज्या बातम्या