मुख्यमंत्री मध्यावधी निवडणुकीला तयार, मात्र सेना बॅकफुटवर

मुख्यमंत्र्यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत भाजपा मध्यावधी निवडणुकीला तयार असल्याचं म्हटलंय. सेनेला मात्र ही बातमी पेरलेली वाटतेय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 15, 2017 07:43 PM IST

मुख्यमंत्री मध्यावधी निवडणुकीला तयार, मात्र सेना बॅकफुटवर

उदय जाधव, 15 जून : राज्यात मध्यावधीच्या निवडणुका लागणार का? हा सवाल विचारण्याचं कारण आहे ते मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीची दाखवलेली तयारी. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत भाजप मध्यावधीला तयार असल्याचं म्हटलंय आणि त्यावरून सेना आता बॅकफुटवर जाताना दिसतेय.

जे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी किंवा भाजपच्या एखाद्या नेत्यानं द्यायला हवं ते सेना नेते संजय राऊत देतायत. मुख्यमंत्र्यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत भाजपा मध्यावधी निवडणुकीला तयार असल्याचं म्हटलंय. सेनेला मात्र ही बातमी पेरलेली वाटतेय. बरं याअगोदरही मुख्यमंत्र्यांनी मध्यावधीची तयारी असल्याचं म्हटलंय. त्यावर मात्र सेना आता पैसे आहेत का म्हणत सवाल उपस्थित करतेय.

सरकारसोबत सत्तेत असूनही शिवसेनेनं कायम सरकारविरोधी भूमिका घेतलीय. त्यामुळे भाजपला शिवसेनेची कटकट वाटते. त्यातून सुटका म्हणून कर्जमाफी करायची आणि लगेचच मध्यावधी निवडणुकीला सामोरं जायचं असं धोरण भाजपनं ठरवल्याचं दिसतंय. कर्जमाफीमुळे पुन्हा सत्तेत येता येईल असंही भाजपला वाटत असावं. भाजपचा हा डाव ओळखूनच सेनेनं तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असं गेल्याच आठवड्यात म्हटलेलं.

देवेंद्र फडणवीस सरकारला सत्तेवर येऊन अडीच वर्षे झालेत. फडणवीसांनी कर्जमाफी केली तर पाच वर्षे पाठिंबा ठेवू असं उद्धव ठाकरेंनी अनेक वेळेस सांगितलं. खरं तर कर्जमाफी होणार नाही आणि त्यावर सरकारला कोंडीत पकडावं असंच धोरण सेनेचं असावं. पण कर्जमाफीमुळे सेनेचा विरोधाचा मुद्दा मुख्यमंत्र्यांनी काढून घेतलाय. त्यामुळेच सेनेचा आता संभ्रम झालेला दिसतोय.

लोकांनी सरकारला निवडून दिलंय ते पाच वर्षे राज्य चालवण्यासाठी. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या इगोत लोकांवर भुर्दंड घालणाऱ्याला जनता धडा शिकवेल अशीच सध्याची स्थिती आहे. त्यामुळे सत्ताधारी महाराष्ट्राचा मूड लक्षात घेतील अशी अपेक्षा करूया.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 15, 2017 05:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...