कर्जमाफीचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार- मुख्यमंत्री

कर्जमाफीतून बँकांचं चांगभलं होऊ यासाठी कर्जमाफीची रक्कम ही बँकांमध्ये नाहीतर थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत दिलंय.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Jul 27, 2017 04:54 PM IST

कर्जमाफीचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार- मुख्यमंत्री

मुंबई, 27 जुलै : कर्जमाफीतून बँकांचं चांगभलं होऊ यासाठी कर्जमाफीची रक्कम ही बँकांमध्ये नाहीतर थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत दिलंय. कर्जमाफीत घोटाळे होऊ नये, यासाठीच आम्ही शेतकऱ्यांकडून फॉर्म भरून घेत असून शेतकऱ्यांना हा कर्जमाफीचा फॉर्म ऑनलाईन तसंच ऑफलाईनही भरता येणार आहे. कर्जमाफीचा फॉर्म हा अतिशय सोपा आणि सुटसुटीत असल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी केलाय.

कर्जमाफीचे फॉर्म शेतकऱ्यांना मोबाईलवरच भरता यावेत यासाठी सरकार कर्जमाफीचे मोबाईल अॅपही लॉन्च करणार आहे. पीक कर्जासाठीचे 10 हजारांचे अॅडव्हान्स देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यातल्या सहकारी बँकांनी सरकारला सहकार्य केलं नसल्याचा आरोपही मुख्यमंत्री करायला विसरले नाहीत. तसंच सरकरट कर्जमाफी राज्याला कदापिही परवडणारी नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात केलं

कर्जमाफीच्या यादीत मुंबईतील लाभार्थ्यांचा समावेश नेमका कसा झाला याचीही सरकार सखोल चौकशी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. युपीएच्या काळातही मुंबईत शेतकरी नेमके कुठून आले याचाही शोध घेणं आवश्यक असल्याचं सांगत त्यांनी विरोधकांना पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न केला. कर्जमाफीच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत सविस्तर निवेदन दिलं.

दरम्यान, विरोधकांनी संघर्ष यात्रा काढून सरकारविरोधात रान उठवल्यामुळेच सरकारला कर्जमाफी करावी लागल्याचा दावा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी सभागृहात केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 27, 2017 03:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...