मुख्यमंत्री बाप्पाच्या दर्शनासाठी थेट राणेंच्या घरी !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री नारायण राणेंच्या घरी जाऊनं बाप्पांचं दर्शन घेतलं. नारायण राणे भाजपमध्ये जाणार अशी गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. त्यापार्श्वभूमीवर राणेंनी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देणं आणि मुख्यमंत्र्यांचं राणेंच्या घरी जाण्याला महत्त्व आलंय.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Aug 26, 2017 02:59 PM IST

मुख्यमंत्री बाप्पाच्या दर्शनासाठी थेट राणेंच्या घरी !

मुंबई, 26 ऑगस्ट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री नारायण राणेंच्या घरी जाऊनं बाप्पांचं दर्शन घेतलं. नारायण राणेंनी कालच मुख्यमंत्र्यांना गणपतीच्या दर्शनाला येण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणेंच्या घरी जाऊन त्यांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेतलं.

नारायण राणे भाजपमध्ये जाणार अशी गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. त्यापार्श्वभूमीवर राणेंनी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देणं आणि मुख्यमंत्र्यांचं राणेंच्या घरी जाण्याला महत्त्व आलंय. नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा फोटो ट्विट केलाय.

दरम्यान, नारायण राणे काँग्रेस सोडणार नाहीत, असा दावा कालच सुशीलकुमार शिंदे यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना केलाय. त्यांच्या दाव्याला 24 तास उलटत नाहीत तोच मुख्यमंत्री राणेंच्या घरी जातात काय आणि नितेश राणे नेमका तोच फोटो ट्विट करतात काय, हा नक्कीच निव्वळ योगायोग नाही. याचाच अर्थ राणे काँग्रेसमधून भाजपमध्ये जाण्यासाठी फारच अधिर झालेत की काय, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातोय.

'दरम्यान  राजकारणात गणराया प्रत्येकवेळी काहीतरी नवीन घेऊन येतो फक्त पात्र बदलतात. यावेळी कुठलं पात्र असेल हे लवकरच कळेल असं वक्तव्य नारायण राणेंनी केलंय'. काल मुख्यमंत्र्यांनी राणेंच्या घरी गणपतीचं दर्शन घेतलं. या भेटीनंतर राणेंच हे वक्तव्य थेट राजकीय संकेत देणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 26, 2017 10:45 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...