मुख्यमंत्री फडणवीसांनी 'या' गुन्ह्यातून बिल्डरांची केली सुटका

रेरा मान्यताप्राप्त प्रकल्प असेल तर बांधकाम ठिकाणावरून पडून झालेला मृत्यू हा अपघात समजला जाईल

News18 Lokmat | Updated On: Jul 23, 2018 09:53 PM IST

मुख्यमंत्री फडणवीसांनी 'या' गुन्ह्यातून बिल्डरांची केली सुटका

पुणे, 23 जुलै : रेरा मान्यताप्राप्त प्रकल्प असेल तर बांधकाम ठिकाणावरून पडून झालेला मृत्यू हा अपघात समजला जाईल आणि बिल्डरावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार नाही अशी महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्यात केली.

डेव्हिड हेडलीवर अमेरिकेतल्या तुरूंगात हल्ला, प्रकृती गंभीर

अपघात घडली की बिल्डर वर गुन्हा दाखल होतो.बिल्डर अडकून पडतो मदत करता येत नाही म्हणून अपघात असेल तर गुन्हा नको अशी मागणी बिल्डर संघटनांनी केली होती.

पुण्यात लोकमत आयोजित विश्वकर्मा कॉफी टेबल बुक प्रकाशन कार्यक्रमात फडणवीस बोलत होते.

राहुल गांधी हे 'नफरत के सौदागर', पीयुष गोयल यांचा पलटवार

Loading...

पुण्यात लोहगाव विमानतळ, आणि खडकवासला परिसरात एनडीए  राष्ट्रीय संरक्षण अकादमीमुळे बांधकाम प्रकल्पांना एनओसी आवश्यक असल्याची अट संरक्षण खात्याने नुकतीच जाहीर केली. यावर ही मुख्यमंत्र्यांनी जुन्या प्रकल्पांना ही अट नको आणि नव्या प्रकल्पासाठी तोडगा काढण्यासाठी संरक्षण मंत्र्यांशी स्वतः बोलेन असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 23, 2018 09:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...