कर्जमाफीला सुरुवात, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना प्रमाणपत्राचं वितरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात कर्जमाफी कार्यक्रम घेण्यात आला.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Oct 18, 2017 02:35 PM IST

कर्जमाफीला सुरुवात, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना प्रमाणपत्राचं वितरण

18 आॅक्टोबर : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम आजपासून त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात कर्जमाफी कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमात 15 शेतकऱ्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात  आले. आज राज्यभरातील एकूण 10 शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. शासकीय अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्राचं वितरण करण्यात आलं. तसंच आपले सरकार या वेबसाईटवरील लाभार्थ्यांच्या नावांच्या यादीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. दरम्यान पुणे, नागपूर आणि कोल्हापुरातही कर्जमाफी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 18, 2017 02:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...