S M L

"साहेब,आमच्या झोपडीत या",आणि मुख्यमंत्र्यांचा ताफा थांबला !

त्र्यंबकेश्वर रस्त्यावर उभ्या असलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं सकाळपासून त्यांची वाट बघत होती. मात्र ही भेट नियोजनात नसल्यानं मुख्यमंत्र्यांचा ताफा भरधाव वेगाने पुढे निघाला.

Sachin Salve | Updated On: Dec 26, 2017 06:41 PM IST

26 डिसेंबर : "साहेब, आमच्या झोपडीत या" असे सूर कानी पडताच भरधाव वेगाने निघालेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा एकदम सा थांबतो आणि मुख्यमंत्री गाडीतून उतरून चिमुरड्यांची भेट घेतात. हे घडलं आहे नाशिकच्या त्र्यंबकेश्वरच्या रस्त्यावर..

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिक दौऱ्यावर होते, त्यांच्या नियोजित कार्यक्रम दरम्यान त्र्यंबकेश्वर रस्त्यावर उभ्या असलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं सकाळपासून त्यांची वाट बघत होती. मात्र ही भेट नियोजनात नसल्यानं मुख्यमंत्र्यांचा ताफा भरधाव वेगाने पुढे निघाला.

मात्र, बऱ्याच वेळापासून उभं असलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांनी मुख्यमंत्री न भेटता पुढे जात असल्यामुळे जोरदार घोषणाबाजी केली. 'मुख्यमंत्री,महोदय आमच्या झोपडीत तरी या' या चिमुरड्यांची हाक कानावर पडताच मुख्यमंत्र्यांनी ताफा थांबवला. तसाच तो मागे परत आला. या घटनेने काही वेळ सगळ्या यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली. मुख्यमंत्री भेटीला आल्यानं मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. 'साहेब आमच्याकडे ही लक्ष द्या' अशा प्रकारची साद मुलांनी मुख्यमंत्र्यांना घातली. मुख्यमंत्र्यांनी सर्व मुलांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्यात आणि नियोजित दौऱ्यासाठी पुन्हा रवाना झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 26, 2017 05:48 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close