28 आॅक्टोबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियुक्त केलेल्या खासगी यंत्रणेमुळे कर्जमाफीच्या प्रक्रियेत घोळ झाला असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण केलाय.
सरकारमधील इतर सर्व घोळ आणि समस्या या प्रशासकीय अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांच्या खाजगी यंत्रणेतील संघर्षामुळे झालाय. जवाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई केली पाहिजे अशी मागणीही चव्हाण यांनी केली.
तसंच सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यावर अनेक आरोप आहेत, ते कशी प्रक्रिया नीट पार पडणार ? असा सवालही चव्हाणांनी उपस्थित केला.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधी बद्दल केलेल्या वक्तव्याचे स्वागत आहे पण सरकारमध्ये असलेली शिवसेना जवाबदारी टाळू शकत नाही असंही चव्हाण म्हणाले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा