06 मार्च : विधानसभेतही औरंगाबाद कचराकोंडीचे आज पडसाद उमटले. पुढच्या 6 महिन्यात कचऱ्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावू आणि लवकरात लवकर कचऱ्याचा प्रश्न सोडवू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.
औरंगाबादमधील कचरा कोंडी आज २०वा दिवस असून कचराकोंडी कायम आहे. याचे पडसाद आज विधानसभेत उमटले. मुख्यमंत्र्यांनी यावर निवदेन दिलं. कचरा कोंडी सोडवण्यासाठी महापालिकेला आर्थिक मदतीसाठी तयार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन दिलं. मी या प्रकरणात हस्तक्षेप करुन औरंगाबादमध्ये पुन्हा बैठक बोलावून हा प्रश्न मार्गी लावू असंही मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, आज सकाळी कांचनवाडी परिसरातील कचरा अज्ञाताने पेटवला. महापालिकेने टाकला हा कचरा टाकला होता. कांचनवाडीतील नागरिकांनी कचरा टाकण्यास विरोध आहे. तर कोर्टात सुनावणीदरम्यान राज्याच्या मुख्य सचिवांनी कोर्टात शपथपत्र सादर केलं. कचऱ्यावर प्रक्रिया कारण्याचा प्रकल्प उभारण्यासाठी 15 मार्च पर्यंत पैशांची तरतूद करुन तो 6 महिन्यात कार्यान्वित करणार असल्याचं शपथपत्रातून सांगण्यात आलं.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा