अमळनेरात मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे, 37 कार्यकर्ते ताब्यात

पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या पाडलसे धरणं कृती समितीच्या 37 कार्यर्त्यांना ताब्यात घेतले. अमळनेर येथे भाजपच्या व्यासपीठावर हाणामारी झाल्यावर मुख्यमंत्री यांच्या सभेकडे सर्वांचं लक्ष आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 19, 2019 03:34 PM IST

अमळनेरात मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे, 37 कार्यकर्ते ताब्यात

जळगाव, १९ एप्रिल- अमळनेरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाडलसे धरण कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. पाडलसे धरणाला निधी द्यावा, या मागणीसाठी आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरले होते.

पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या पाडलसे धरणं कृती समितीच्या 37 कार्यर्त्यांना ताब्यात घेतले. अमळनेर येथे भाजपच्या व्यासपीठावर हाणामारी झाल्यावर मुख्यमंत्री यांच्या सभेकडे सर्वांचं लक्ष आहे. अमळनेर इथं छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाजवळील मैदानावर त्यांची सभा होणार आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या शुक्रवारी जळगाव जिल्ह्यात तीन सभा आहेत. अमळनेर, रावेर व जळगाव येथे त्यांच्या जाहीर सभा आहेत. अमळनेरनंतर रावेर येथील शिवप्रसाद नगरात  तर जळगाव येथील सागर पार्क मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे.


SPECIAL REPORT: तिकीट..तिकीट म्हणत एसटी कर्मचाऱ्याने केली अनोखी जनाजागृती

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 19, 2019 03:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...