मुंबई, 01 डिसेंबर : यंदाचं हिवाळी अधिवेशन गाजलं असं म्हणायला हरकत नाही कारण. या अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण मिळालं आहे. त्यावर आता राज्यपाल विद्यासागर राव यांनीदेखील स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यामुळे विरोधकांची सरकारने बोलती बंद केली अश्या चर्चांना सध्या उधाण आलं.
त्यात हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विरोधक आणि युतीच्या मुद्यावर कोटी करताना मुख्यमंत्र्यांनी शेरोशायरी केली आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तर त्यांनी या कवितेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघर्ष यात्रेवर कोटी केली.
मुख्यमंत्र्यांची कविता...
"माझ्यावर टीकेची करून कामना
विखे पाटील वाचतात सामना
संघर्ष यात्रेला लाभेना गर्दी
म्हणून त्यांच्या घरी वर्तमानपत्रांची वर्दी
जनता जनार्दन आमच्याच बाजूला
आणि तुमची खुर्ची असेल 'त्याच' बाजूला
2019 चा महासंग्राम आला जवळ
बाजी मारणार सेनेचा बाण अन भाजपचे कमळ!"
माझ्यावर टीकेची करून कामना
विखे पाटील वाचतात सामना.. #WinterSession pic.twitter.com/9G6wcWqdXn
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 30, 2018
दरम्यान, शिवसेना आपलं मुखपत्र सामनामध्ये काय भूमिका मांडतोय यावरून सामना सरकार चालवत नाही, मी सरकार चालवतोय असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला होता. तसंच पुढचाही मुख्यमंत्री मी असेल आणि याच कार्यक्रमाला हजर राहणार आहे असंही मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितलं होतं.
तर सध्या मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर राज्यातील धनगर समाज बांधव एसटीतील आरक्षणासाठी आक्रमक झाले. आंदोलकांनी विधानभवनाबाहेर घोषणाबाजी करत सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तसेच सभागृहात विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं.
धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तसंच आगामी अधिवेशनापूर्वी धनगर आरक्षणाचा एटीआर आणू असं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत स्पष्ट केलं.
काचेच्या प्लेट उचलून ठेवताना पडल्या अंगावर, श्वास रोखायला लावणार CCTV
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा