संघर्षयात्रेतील नेते 'निर्लज्ज आणि कोडगे', मुख्यमंत्र्यांचा घणाघात

संघर्षयात्रेतील नेते 'निर्लज्ज आणि कोडगे', मुख्यमंत्र्यांचा घणाघात

असं कोणतंही खातं नाही तिथे यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले नव्हते. तरी सुद्धा आज कुठल्या तोंडाने शेतकऱ्यांसमोर जाताय.

  • Share this:

27 एप्रिल : आज शेतकऱ्यांच्या अवस्थेला काँग्रेस-राष्ट्रवादीचेच नेते जबाबदार आहे. असं कोणतंही खातं नाही तिथे यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले नव्हते. तरी सुद्धा आज कुठल्या तोंडाने शेतकऱ्यांसमोर जाताय. मुळात संघर्षयात्रा काढणारे काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते निर्लज्ज आणि कोडगे आहे अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या कार्यकारणी बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला.  आघाडी सरकारच्या काळात 13 लाख टन तुरीचं उत्पादन झालं होतं. त्यावेळी फक्त 20 हजार टन तूर खेरीदी केली आणि पैसे 9 महिन्यानंतर दिले होते अशी आठवण मुख्यमंत्र्यांनी करून दिली. जे काही पॅकेज आले ते आघाडी सरकारच्या नेत्यांनी लाटली. असं कोणतंही खातं नाही जिथे याचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले नाही. मुळात आज पिंपरी, सोलापूर, कोल्हापूर, सांगली असे सर्वच बुरूज ढासळले जे नेते जनतेपासून तुटले ते सर्व नेते मागे पडले आहे अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली.

'संघर्षयात्रेतील नेते निर्लज्ज आणि कोडगे'

नावात संघर्ष असला म्हणून संघर्ष होत नाही. संघर्ष यात्रेमुळे 18 वर्षानंतर या नेत्यांना जमिनीवर आणलंय. विरोधकांच्या संघर्ष यात्रेला प्रतिसाद नाही. संघर्षयात्रेतील नेत्यांमुळे आज शेतकऱ्यांची अशी अवस्था आहे. शेती असो सिंचन क्षेत्र असो प्रत्येक ठिकाणी यांनी खाऊगिरी केली आहे. 15 वर्ष सत्ता उपभोगली शेतकऱ्यांसाठी काही करू शकले नाही. पंतप्रधान पॅकेज आलं ते वाटून खालं. तरी सुद्धा निर्लज्जासारखं शेतकऱ्यांकडे जाऊन तुम्ही कसं बोलू शकता ?, खरं म्हणजे एवढे कोडगे नेते कसे तयार होऊ शकतात याचं मला आश्चर्य वाटतं अशी घणाघाती टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

'भाजप हा महाराष्ट्रव्यापी पक्ष'

2017 चा भाजपचा विजय हा विकासाचा आणि विश्वासाचा विजय आहे. आम्ही लाटेवर विजय नाही झालो तर विकासाच्या मुद्यावर विजयी झालो. त्यामुळेच राज्यात भाजप क्रमांक एकचा पक्ष आहे.

भाजप हा महाराष्ट्रव्यापी पक्ष असून इतर सर्व पक्ष हे काही भागापूरतेच मर्यादीत राहिले आहे असंही मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितलं.

'शेतकऱ्यांसाठी संवाद यात्रा काढणार'

22 तारखेपर्यंत आलेल्या सर्वच शेतकऱ्यांची तूर विकत घेतली जाणार आहे. जर शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांनी तूर विकली तर फौजदारी गुन्हा दाखल करणार असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी  भाजप संवाद यात्रा काढणार  अशी घोषणाही यावेळी त्यांनी केली.

महानगरपालिका आणि पालिकांमध्ये जर गैरकारभार झाला तर आम्ही त्या लोकांना सत्तेत राहु देणार नाही. पारदर्शकता आणि प्रमाणिकतेशी तडजोड केली जाणार नाही असंही  मुख्यमंत्र्यांनी ठणकावून  सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 27, 2017 04:38 PM IST

ताज्या बातम्या